Plane crash News: नेपाळची मुलगी, बिहारमध्ये शिकली, विमान कंपनीत कमाला लागली, पण पुढे भयंकर शेवट

मूळची नेपाळची असलेल्या मनीषाचे वडील राजू थापा बिहार मिलिटरी पोलिसांमध्ये (BMP) कामाला होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 171 विमानाचा अपघात होताच अनेक स्वप्नेही भंग पावली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाला लंडनच्या गॅटविक येथे उतरणे अपेक्षित होते. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. यात 230 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला. या क्रू मेंबर्समध्ये मनीषा थापा हे एक नाव होते. नेपाळची ही हुशार मुलगी बिहारमध्ये शिकली. तिने आपलं स्वप्न मेहनतीच्या जोरावर साकार केलं. ती देशातील प्रतिष्ठित एअरलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियामध्ये नोकरीला लागली. पण नियतीच्या मनात काही तर वेगळचं होतं. त्याच मनिषाची ही संघर्षमय कहाणी. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंडिगोपासून केली सुरुवात
मनीषा थापा बिहारची राजधानी पाटणा येथील सेंट झेवियर्स कॉलेजची विद्यार्थिनी होती. मनीषाने 2014 ते 2017 या काळात येथे शिक्षण घेतले. तिची गणना हुशार विद्यार्थिनींमध्ये केली जात होती. मनीषाने इंडिगो एअरलाईन्समध्ये ग्राउंड सपोर्टिंग स्टाफ म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती अकासा एअरमध्ये रुजू झाली. नंतर एअर इंडियामध्ये केबिन क्रू मेंबर म्हणून काम करू लागली. ती केबिन क्रू मेंबर म्हणून लंडन आणि ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानां बरोबर नेहमी जात होती. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

कॉलेजमध्ये होती सर्वात हुशार विद्यार्थिनी 
गुरूवारी अहमदाबादहून जे विमान लंडनला जाणारं होतं. त्या विमानात ही केबिन क्रू म्हणून मनिषा कार्यरत होती. लंडनला जाणं तिच्यासाठी नविन नव्हतं. नेहमी प्रमाणे सर्व काही नॉर्मल होतं. विमानाने उड्डाण ही केलं. पण काही क्षणात होत्याचं नव्हतं. लंडनला उतरणारं विमान अहमदाबादलाच कोसळलं. डोळ्या समोर विमानाचा कोळसा झाला. त्यात मनीषाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मनीषाच्या कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांना ही बातमी समजली. त्यामुळे ते सर्वच शॉक झाले. कॉलेज प्रशासनाने मनीषाच्या स्मरणार्थ शनिवारी सकाळी 8:45 वाजता शोकसभा ही बोलावली आहे. तिच्या या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. 

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...

मूळची नेपाळची होती मनीषा
मूळची नेपाळची असलेल्या मनीषाचे वडील राजू थापा बिहार मिलिटरी पोलिसांमध्ये (BMP) कामाला होते. तिच्या घरात तिची आई लक्ष्मी आणि एक मोठा भाऊ आहे. मनीषाने सेंट झेवियर्स कॉलेजमधून बीबीई म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस इकोनॉमिक्सचे शिक्षण घेतले होते. मनीषा तिच्या सहकाऱ्यांमध्ये एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व होती. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठई मनीषाने खूप मेहनत घेतली जाते. त्यामुळेच तिच्या कॉलेजमध्ये ही तिला आज ही ओळखले जाते. एक मेहनत करणारी तरुणी अशी तिची ओळख आहे. त्यामुळेच ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. पण तिचा हा प्रवास सुरू होताच संपला त्यामुळे सर्वच जण हळहळून गेले आहेत. 

Advertisement