विमान कोसळलं, 260 जणांचा मृत्यू; अहमदाबादच्या विमान अपघाताचा व्हिडिओ शूट करणाऱ्या मुलाने शहर का सोडलं?

अहमदाबाद विमान अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. या अपघातात तब्बल २६० जणांचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ahmedabad Plane Crash 1 year : अहमदाबाद विमान अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं एक विमान टेक ऑफ केल्याच्या अवघ्या ३२ सेकंदात कोसळलं. 

हे विमान एअरपोर्टजवळ मेघानीनगर भागातील बीजी मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीला धडकलं. या भीषण विमान अपघातात एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये विमानातील २४२ प्रवासी आणि १० वसतिगृह-इतर भागातील १९ जणांचा समावेश आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अरावली जिल्ह्यातील तीन महिलांचाही मृत्यू झाला. 

Advertisement

भयानक दृश्य स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं...

यादरम्यान अरावली जिल्ह्यातील मेघराज तालुक्यातील खानपू::र गावातील आर्यन अंसारी (१७) याने स्वत:च्या डोळ्याने हा अपघात पाहिला. अहमदाबादमधील मेघानीनगर भागातील घराच्या छतावर उभा होता. तेव्हा त्याची नजर अत्यंत खालून उडणाऱ्या विमानाकडे गेली. यानंतर आर्यनने तातडीने आपला मोबाइल फोन काढला आणि व्हिडिओ करू लागला. यानंतर पुढल्या काही क्षणात विमान महाविद्यालयाच्या इमारतीला धडकलं आणि एकदम धुराचे लोट उठले. हे भयानक दृश्य आर्यनच्या मोबाइलमध्ये कैद झालं. 

नक्की वाचा - गॉडझिला अल् निनो काय आहे? भारताच्या दिशेने वाटचाल; शेतीपासून पॉवरग्रीडपर्यंत सर्व उद्ध्वस्त होण्याचा महाधोका!


आर्यन शहर सोडलं...

त्या अपघातानंतर अनेकजण त्याला विमान अपघात शूट करणारा मुलगा म्हणून ओळखू लागले. आर्यन तेव्हा १२ वीत होता. त्याच्या घरी माध्यमांची ये-जा वाढली होती. कॉलेज, गावात त्याला वारंवार त्या व्हिडिओविषयी विचारलं जात होतं. सर्वच माध्यमांनी त्याने शूट केलेला व्हिडिओ वापरला. व्हिडिओ पूर्वी त्याला कुणी ओळखत नव्हतं. मात्र अपघातानंतर त्याला सर्वजण ओळखू लागले, त्या व्हिडिओबद्दल विचारू लागले. अचानक मिळणाऱ्या या प्रसिद्धीने आर्यन कासाविस होऊ लागला. आपण पुन्हा असं काही रेकॉर्ड केलं तर पुन्हा मीडियासह सर्वांकडून प्रश्नांचा भडिमार होईल अशी भीती त्याला वाटू लागली. लोक त्याला सतत अनेक प्रश्न विचारत होते. यासाठी त्याला कुटुंबीयांनी गावी पाठवल्याचं सांगितलं जात आहे. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.