
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबाद विमानतळावरून आज दुपारी (गुरुवार, 12 जून 2025) उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान कोसळले. या विमानात 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर असे एकूण 242 जण होते. हा भारतातील आतापर्यंतच्या सर्वात भीषण विमान दुर्घटनांपैकी एक आहे. या अपघातामध्ये सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची भीती अहमदाबाद पोलीस संचालकांनी AFP या वृत्तसंस्थेला बोलताना दिली आहे.
हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर आदळले, ज्यात किमान पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. विमानाचे अवशेष हॉस्टेल मेसच्या भिंतीमधून आत कोसळले. त्यावेळी काही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं जेवण त्यावेळी सुरु होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमानाचा कमी उंचीवरून उडताना आणि उंची वाढवण्यासाठी संघर्ष करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनुसार विमान दुपारी 1.38 वाजता जमिनीवर आदळले आणि मोठा स्फोट झाला. लंडनपर्यंत लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने त्यात इंधन भरलेले होते.
उड्डाणानंतर लगेचच, वैमानिकाने 'मेडे' (Mayday) कॉल पाठवला. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रकाकडून (Air Traffic Controller) पुन्हा पुन्हा केलेल्या कॉल्सला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे अहवालात म्हटले आहे.
अहमदाबाद-लंडन गॅटविक मार्गावर जाणारे फ्लाइट क्रमांक AI 171 मध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
या अपघातानंतर घटनास्थळी किमान दोन डझन रुग्णवाहिका पोहोचल्या आणि काहींनी जखमींना रुग्णालयात नेले. पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरपू यांनी सांगितले की ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्व विमान वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद एजन्सींना त्वरित आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
'माझे विचार आणि प्रार्थना विमानात असलेल्या सर्व लोकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,' असे त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान कोसळलं, वाचा आत्तापर्यंतचे देशातील मोठे अपघात )
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एका निवेदनात म्हटले आहे की, ८,२०० तासांचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित सभरवाल आणि १,१०० तासांचा अनुभव असलेले फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदार यांनी अपघात होण्यापूर्वी 'मेडे' कॉल केला होता.
एअर इंडियाने अधिक माहिती देण्यासाठी 1800 5691 444 हा विशेष प्रवासी हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world