'लेट नाईट पार्टी करु नका, बलात्कार होईल' पोलिसांनीच लावले पोस्टर्स! शहरात खळबळ

जाहिरात
Read Time: 2 mins
शहरातील काही भागात लावण्यात आलेल्या या पोस्टर्समुळे खळबळ उडाली होती.
मुंबई:

अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षितता मोहिमेसाठी कथितपणे प्रायोजित केलेल्या पोस्टर्समुळे वाद निर्माण झाला आहे. यापैकी काही पोस्टर्समध्ये महिलांना बलात्कारापासून वाचण्यासाठी घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शहरातील काही भागांमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

काय आहेत पोस्टर्स?

शहरातील काही भागात लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवर असे लिहिले होते की, “रात्री उशिरा पार्टीत जाऊ नका, तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो” आणि “तुमच्या मित्रासोबत अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी जाऊ नका, जर तिच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर?”

ही पोस्टर्स सोला आणि चांदलोडिया परिसरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर लावण्यात आली होती, जी आता हटवण्यात आली आहेत.

( नक्की वाचा : Malegaon Blast Case: 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक खुलासा )
 

पोलिसांचा दावा काय?

पोलीस उपायुक्त (पश्चिम वाहतूक) नीता देसाई यांनी स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांनी केवळ रस्ते सुरक्षेशी संबंधित पोस्टर्सना प्रायोजित केले होते, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित पोस्टर्सना नाही. त्यांनी दावा केला की ‘सतर्कता ग्रुप' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर्स बनवली आणि लावली.

देसाई म्हणाल्या, “त्या स्वयंसेवी संस्थेने आमच्याशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की त्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाहतूक जागरूकता कार्यक्रम आयोजित करायचे आहेत.  त्यासाठी त्यांना आमच्या कर्मचाऱ्यांची मदत हवी आहे. त्यांनी आम्हाला फक्त वाहतूक जागरूकतेशी संबंधित पोस्टर्स दाखवली होती, ही वादग्रस्त पोस्टर्स नाहीत. ही पोस्टर्स आमच्या माहितीशिवाय लावण्यात आली होती. आम्हाला याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही ती तात्काळ हटवली.”

Advertisement

या प्रकरणावरून आम आदमी पार्टी (आप) ने भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारवर निशाणा साधला असून, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विरोधकांची टीका

‘आप'ने एका निवेदनात म्हटले आहे की, “गुजरातमध्ये महिलांच्या सबलीकरणाची गोष्ट करणाऱ्या भाजपा सरकारचे वास्तव काहीतरी वेगळेच आहे. गेल्या 3 वर्षांत राज्यात 6,500 पेक्षा जास्त बलात्कार आणि 36 पेक्षा जास्त सामूहिक बलात्कारांची प्रकरणे नोंद झाली आहेत. सरासरी दररोज 5 पेक्षा जास्त बलात्कार होतात.”

Advertisement

या निवेदनात पुढे म्हटले आहे, “मुख्यमंत्री आणि भाजपा नेते महिला सुरक्षिततेबद्दल बोलतात, पण अहमदाबादसारख्या मोठ्या शहरात लावण्यात आलेली अशी पोस्टर्स गुजरातचे सत्य सांगतात. आमचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की, गुजरातच्या महिला रात्री घरातून बाहेर पडू शकतात की नाही?”

Topics mentioned in this article