Air India चा मोठा घोळ! दिल्लीहून कॅनडाला निघालेलं विमान 8 तास हवेत फिरुन पुन्हा दिल्लीतच उतरलं; नेमकं काय घडलं

Air India : विमानाने उड्डाण केले, प्रवासी स्वप्न पाहत होते की काही तासांत ते कॅनडाच्या भूमीवर असतील. तब्बल 8 तास विमान हवेत होते, पण जेव्हा ते जमिनीवर उतरले, तेव्हा प्रवासी ज्या विमानतळावरून निघाले होते, तिथेच परत आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Air India : एअर इंडियाच्या चुकीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला.
मुंबई:

Air India : विमानाने उड्डाण केले, प्रवासी स्वप्न पाहत होते की काही तासांत ते कॅनडाच्या भूमीवर असतील. तब्बल 8 तास विमान हवेत होते, पण जेव्हा ते जमिनीवर उतरले, तेव्हा प्रवासी ज्या विमानतळावरून निघाले होते, तिथेच परत आले. एअर इंडियाच्या दिल्ली ते व्हँकुव्हर या विमानाबाबत घडलेला हा प्रकार म्हणजे तांत्रिक घोळ आणि नियोजनाचा अभाव याचा कळस मानला जात आहे. चुकीच्या विमानाची निवड केल्यामुळे शेकडो प्रवाशांना या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

नेमका काय घडला प्रकार?

एअर इंडियाचे एआय 185 हे विमान दिल्लीहून काल सकाळी 11:34 वाजता व्हँकुव्हरसाठी झेपावले. विमानाने पूर्वेकडील मार्ग धरला आणि साधारण 4 तासांचा प्रवास पूर्ण करून ते चीनच्या हवाई हद्दीत पोहचले. कुनमिंगजवळ विमान असताना अचानक एअर इंडियाच्या प्रशासनाला लक्षात आले की, त्यांनी ज्या विमानाने प्रवाशांना पाठवले आहे, त्या विमानाला कॅनडात प्रवेश करण्याची कायदेशीर परवानगीच नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Bank Holiday: बँक अलर्ट! तिसरा शनिवार आणि ईद, तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती )

चुकीचे विमान आणि तांत्रिक अडचण

एअर इंडियाने या प्रवासासाठी बोईंग 777-200 एलआर या विमानाचा वापर केला होता. मात्र, नियमांनुसार एअर इंडियाला कॅनडासाठी केवळ बोईंग 777-300 ईआर या विमानाचा वापर करण्याची परवानगी आहे. प्रत्येक देशाचे विमान वाहतुकीचे नियम वेगळे असतात. काही देशांमध्ये ठराविक प्रकारच्या विमानांना किंवा त्यांच्या टेल नंबरलाच प्रवेश दिला जातो. हा तांत्रिक घोळ लक्षात येताच विमानाला तातडीने दिल्लीला परत फिरण्याचे आदेश देण्यात आले.

8 तासांचा प्रवास आणि इंधनाचा प्रचंड खर्च

हे विमान तब्बल 7 तास आणि 54 मिनिटे हवेत होते. ज्या ठिकाणाहून निघाले, तिथेच परतण्यासाठी या विमानाला इतका वेळ लागला. या एका चुकीमुळे एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. बोईंग 777 सारखे विमान एका तासाला साधारण 8 ते 9 टन इंधन जाळते. 8 तासांच्या या निष्फळ प्रवासासाठी झालेला इंधनाचा खर्च कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )

एअर इंडियाचे स्पष्टीकरण आणि प्रवाशांची सोय

या प्रकारानंतर एअर इंडियाने अधिकृत पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे. ऑपरेशनल इश्यूमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आणि आज सकाळी दुसऱ्या विमानाने या प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पाठवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत, मात्र या घटनेमुळे एअर इंडियाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
 

Topics mentioned in this article