'एअर इंडिया एक्स्प्रेस'मधील संप समाप्त, निलंबित कर्माचाऱ्यांबाबत झाला निर्णय

Air India Express Strike Withdraws :  एअर इंडिया एक्स्प्रेसमधील  (Air India Express) संप समाप्त झाला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Air India Express : एअर इंडिया एक्स्प्रेसमधील संप समाप्त झाला आहे.
मुंबई:

Air India Express Strike Withdraws :  एअर इंडिया एक्स्प्रेसमधील  (Air India Express) संप समाप्त झाला आहे. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येणार असल्याची माहिती लेबर कमिशनरनं दिली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसमधील केबिन क्रूचे जवळपास 300 वरिष्ठ सदस्य बुधवारी (8 मे) ऐनवेळी रजेवर गेले होते. त्यांनी आजारपणाचे कारण देत सामूहिक रजा घेतली तसंच स्वत:चे मोबाईल बंद केले. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे अनेक  उड्डाणं रद्द करण्यात आली होती. 

कंपनीने आज ( 9 मे) सामूहिक रजा घेणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांचं निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना आता पुन्हा एकदा कामावर घेतलं जाणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसमधील गोंधळाचा फटका प्रवाशांना दोन दिवस सहन करावा लागला. गुरुवारीही एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जी उड्डाणं रद्द करण्यात आली त्यात चेन्नई ते कलकत्ता, चेन्नई ते सिंगापूर आणि त्रिचे ते सिंगापूर फ्लाइट्सचा समावेश आहे. तर लखनऊ ते बंगळुरू फ्लाइट उशिरा होती. कर्मचाऱ्यांच्या बंडखोरीमागे नोकरीतील नव्या अटी असल्याचं सांगितलं जात आहे.

( नक्की वाचा : 300 कर्मचाऱ्यांनी का रोखलं Air India Express चं उड्डाण? 10 मुद्यांमध्ये समजून घ्या पूर्ण प्रकरण )