जाहिरात
Story ProgressBack

300 कर्मचाऱ्यांनी का रोखलं Air India Express चं उड्डाण? 10 मुद्यांमध्ये समजून घ्या पूर्ण प्रकरण

Air India Express Crisis: एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) चा स्टाफ एकाचवेळी आजारपणाच्या सामूहिक रजेवर (Sick Leave) गेला. जवळपास 300 वरिष्ठ केबिन क्रू आणि सदस्यांनी शेवटच्या क्षणी आजारी असल्याचं कळवलं आणि मोबाईल फोन बंद केले.

Read Time4 min
300 ????????????? ?? ????? Air India Express ?? ??????? 10 ???????????? ????? ???? ????? ??????
Air India Express : एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये हे संकट का निर्माण झालं?
मुंबई:

Air India Express Crisis: एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) चा स्टाफ एकाचवेळी आजारपणाच्या सामूहिक रजेवर (Sick Leave) गेला. जवळपास 300 वरिष्ठ केबिन क्रू आणि सदस्यांनी शेवटच्या क्षणी आजारी असल्याचं कळवलं आणि मोबाईल फोन बंद केले.

टाटा ग्रुपच्या (Tata Group) एअरलाईन्स कंपनीमधील आर्थिक संकट पुन्हा वाढत चाललंय. एअर इंडिया  (Air India)  आणि विस्तारा (Vistara Airline) च्या सेवांबाबत मिळत असलेल्या तक्रारी यापूर्वीही करण्यात येत होत्या. त्यातच बुधवारी (8 मे) घडलेल्या प्रकारामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express) जवळपास 300 कर्मचारी एकाच दिवशी आजारपणाचं कारण देत (Sick Leave) सामूहिक रजेवर गेले. या सर्वांनी शेवटच्या क्षणी कंपनीला ही माहिती दिली. त्याचबरोबर स्वत:चे मोबाईलही बंद ठेवले. कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेमुळे एअर इंडिया एक्स्प्रेसचे जवळपास 78 उड्डाण रद्द करावी लागली. या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेचं पाऊल का उचललं? हे समजून घेऊया

( नक्की वाचा : रजा टाकली, मोबाइल बंद केले, 300 कर्मचारी अचनाक सुट्टीवर, एअर इंडियाची 86 उड्डाणं रद्द )
 

1.  'एअर इंडिया एक्स्प्रेस' स्टाफची संघटना ‘एअर इंडिया एक्सप्रेस एम्प्लॉइज यूनियन' नं गेल्या महिन्यात कंपनी मॅनेजमेंटला चिठ्ठी लिहून त्यांच्या मागण्या आणि अडचणी कळवल्या होत्या. ही युनियन भारतीय मजदूर संघाशी संबंधित आहे.
2. एअर इंडिया एक्स्प्रेस कर्मचारी संघ (AIXEU) जवळपास 300 क्रू सदस्यांचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामध्ये मुख्यत: वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मॅनेजमेंट योग्य नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतोय असा कथित आरोप त्यांनी केलाय. 
3. एअर इंडिया एक्स्प्रेस, एअर इंडिया आशिया आणि विस्तारा हे सर्व टाटा ग्रुपचा भाग आहेत. त्यामुळे नोकरीचे नियमही बदलले आहेत. मेरिट सिस्टम लागू करण्यासह अनेक नवे नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम जुन्या कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
4. एअरलाईन्सचं मॅनेजमेंट योग्य पद्धतीनं काम करत नाही. तसंच कर्मचाऱ्यांना समानतेची वागणूक मिळत नाही, असा आरोप केबिन क्रू चं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका ग्रुपनं केला होता. या कारणांमुळे नाराज असलेले कर्मचारी एकाचवेळी सामूहिक रजेवर गेल्याची शक्यता आहे.
5. टाटा ग्रुपचे कर्मचाऱ्यांसाठी असलेले नियम हे देखील असंतोषाचं एक कारण असू शकतं.  एअर इंडियाकडून टाटा ग्रुपच्या संचालकांना एप्रिल महिन्यात एक पत्र लिहिण्यात आलं होतं. यामध्ये HRA चं कारण देत पगारात कपात केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना समान वागणूक देण्याची मागणीही केली होती. 
6. एअर इंडियाच्या अधिग्रहणानंतर काही दिवसांमध्येच काही कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्तम रेकॉर्ड असूनही नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. वास्तविक 2 वर्ष कुणालाही नोकरीवरुन काढण्यात येणार नाही, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं होतं. या प्रश्नावरही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
7. एअर इंडिया एक्स्प्रेमधील कर्मचाऱ्यांनी वरच्या रँकसह मुलाखत क्लियर केल्यानंतरही त्यांना लोअर ग्रेडचा जॉब देण्यात आला. शॉर्टलिस्ट केलेल्या काही जणांना हटवण्यात आले. तर कमी अनुभव असलेल्या बाहेरच्या काही जणांना सिनिअर रँक देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा देखील मॅनेजमेंटसमोर उपस्थित केलाय. 
8.  पत्रानुसार एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी HRA, प्रवासी भत्ता, महागाई भत्ता यासारख्या महत्त्वांच्या सूविधेबाबतही तक्रार केली आहे. हे सर्व भत्ते त्यांना एअर आशिया इंडियासोबतच्या विलिनिकरणापूर्वी मिळत होते. विलिनिकरणानंतर ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार खूप कमी झालाय.
9. एअरलाईन्स चालवण्याचा कर्मचाऱ्यांचा अनुभव, ज्येष्ठता तसंच क्षमतांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर तसंच ग्राहकांना मिळणारा अनुभव आणि कंपनीच्या कामगिरीवरही होत असल्याची तक्रार आहे. 
10. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्स्प्रेसची 86 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानं रद्द करण्यात आली. अचानक विमान रद्द झाल्याचा फटका प्रवाशांना बसलाय. प्रवाशांनी सोशल मीडिया अकाऊंटवर विमानाचं उड्डाण रद्द झाल्याची तक्रार केली. विमानतळावर पोहचोल्यानंतरच आम्हाला विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली आहे. 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination