Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; 242 प्रवासी असल्याची माहिती

Air India Plane Crashed : एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळ्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी येथे ही दुर्घटना घडली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Air India Plane Crash : एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळ्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर येथे ही दुर्घटना घडली आहे. टेक ऑफच्या वेळी ही दुर्घटना घडल्याचे माहिती मिळत आहे. अहमदाबादहून लंडन येथे हे विमान जात होतं अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. 

विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातचं हे विमान कोसळल्याचं कळतंय. साधारण 1.17 वाजता या विमानाने टेक ऑफ केलं, तर दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 

विमान दुर्घटनेनंतर आगीचा मोठा भडका उडून धुराचे लोट हवेत उठताना दिसले. घटनेनंतर अग्निशमन दल आणि इतर बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमानात 242 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देखील मिळत आहे. 

Topics mentioned in this article