जाहिरात

Scorpio Murder Mystery: बापाचा छळ अन् मुलाचा सूड! जळत्या स्कॉर्पिओतील 4 मृत्यूंचं धक्कादायक सत्य उघड

Ajmer Shocking Murder Mystery: एका जळत्या स्कॉर्पिओमध्ये 4 जणांचे सापडलेले सांगाडे हा अपघात नसून एक भयानक नरसंहार असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Scorpio Murder Mystery:  बापाचा छळ अन् मुलाचा सूड! जळत्या स्कॉर्पिओतील 4 मृत्यूंचं धक्कादायक सत्य उघड
Ajmer Shocking Murder Mystery: Dn
मुंबई:

Ajmer Shocking Murder Mystery: एका जळत्या स्कॉर्पिओमध्ये 4 जणांचे सापडलेले सांगाडे हा अपघात नसून एक भयानक नरसंहार असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही केवळ आगीची घटना नसून पोटच्या मुलानेच आपल्या कुटुंबाला संपवल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्री आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याची आई आणि बहिणीच्या मदतीने वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांचा बळी घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अराई रोडवर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाला यांच्या नेतृत्वाखालील टीमने तपास केला असता, हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृताची पहिली पत्नी, मुलगी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे मृत माजी सरपंच रामसिंह चौधरी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादात दडलेली आहेत.

दोन लग्ने आणि सहा वर्षांचा कलह

रामसिंह चौधरी यांनी 2005 मध्ये सुनीता यांच्याशी पहिले लग्न केले होते. मात्र, 2019 मध्ये त्यांनी सुनीताच्या संमतीशिवाय सुरज्ञान नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या लग्नानंतर घरात सतत वादाचे वातावरण असायचे. पहिल्या पत्नीला आणि तिच्या मुलांना घरात दुय्यम वागणूक दिली जात होती, ज्यातून मुलाच्या मनात वडिलांबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता.

( नक्की वाचा : Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी )

छळवणुकीचा भयानक अंत

पोलिसांच्या चौकशीत आरोपी मुलाने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याचे वडील दारूच्या नशेत आईला अत्यंत अमानुषपणे मारहाण करायचे. त्यांना घरात कैद करून ठेवले जात होते. वडिलांच्या या त्रासाला कंटाळून मुलाने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवला होता. 27 मे रोजी पुन्हा वाद झाल्यानंतर, रात्री वडील झोपेत असताना मुलाने त्यांचा गळा चिरला. हे पाहून जागी झालेली सावत्र आई, आजी आणि चुलत बहीण या सर्वांनाही त्याने पुराव्यासाठी ठार केले.

पुरावा नष्ट करण्यासाठी कार पेटवली

हत्याकांड केल्यानंतर आरोपींनी हे प्रकरण अपघाती मृत्यूचे दाखवण्यासाठी रचलेला कट थक्क करणारा आहे. त्यांनी घरातील ट्रॅक्टरमधून डिझेल काढले आणि चारही मृतदेह ओढत नेऊन स्कॉर्पिओमध्ये टाकले. घरापासून 500 मीटर अंतरावर गाडी नेऊन तिथे डिझेल ओतून ती पेटवून दिली. त्यानंतर घरी येऊन रक्ताचे डाग पुसण्यासाठी संपूर्ण घर केमिकलने धुवून काढले.

( नक्की वाचा : हृदयद्रावक! जमीन विकली, मजुरी केली पण पत्नीला शिकवलं; नोकरी मिळताच तिने प्रियकराचा हात धरला )
 

कसे सापडले गुन्हेगार?

आरोपींनी ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाली असल्याचा बनाव केला होता, पण फॉरेन्सिक टीमने त्यांचा हा खेळ बिघडवला. जळालेल्या गाडीच्या मागच्या सीट फोल्ड होत्या, जे मृतदेह तिथे कोंबले असल्याचे दर्शवत होते. सावत्र आईचा मृतदेह गाडीबाहेर रक्ताच्या थारोळ्यात सापडला, ज्यामुळे हत्येचा संशय बळावला. घरातील भिंतींवर केमिकलने धुवूनही रक्ताचे अवशेष सापडले. तसेच ट्रॅक्टरमधील डिझेल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आणि कार ज्या मार्गावर सापडली तो रुग्णालयाकडे जाणारा रस्ता नव्हताच. या तांत्रिक पुराव्यांनी आरोपींचा खोटेपणा उघड केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com