- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने लोकसभा में बताया कि ऑपरेशन महादेव में पहलगाम के तीन आतंकवादी मारे गए
- मारे गए आतंकवादियों में सुलेमान, अफगान और जिबरान शामिल थे, जो ए-श्रेणी के लश्कर-ए-तैयबा के सदस्य थे
- आतंकवादियों को भारतीय सेना, CRPF और जम्मू-कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान मार गिराया गया
संसदेत आज दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चेची सुरु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने केली. विरोधकांकडून सातत्याने विचारणा केली जात होती की, पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी कुठे आहेत? विरोधकांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी ऑपरेशन महादेवची सविस्तर माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांबद्दलही शोक व्यक्त केला. अमित शहा म्हणाले की, संपूर्ण देशाला ऑपरेशन महादेवमध्ये काल सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. यापैकी सुलेमान लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी होता. आमच्या एजन्सींकडे याचे पुरावे आहेत. इतर दोन दहशतवादी देखील ए ग्रेड दहशतवादी होते. मी संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की हे तीन दहशतवादी तेच होते ज्यांनी बैसरन खोऱ्यात आपल्या लोकांना मारले होते. आता या तिघांचाही खात्मा भारतीय सैन्याने केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य हल्लेखोरांच्या शोधात
अमित शाह यांनी म्हटलं की, पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी सुरक्षा बैठक झाली, सर्व सुरक्षा दलांसोबत झालेल्या या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात पळून जाऊ नयेत आणि आम्ही त्यासाठी व्यवस्था केली. आम्हाला दाचीगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. मे ते २२ जुलै या कालावधीत या माहितीची पुष्टी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. दहशतवाद्यांचे संकेत मिळवण्यासाठी लष्कर, सीआरपीएफ आणि आयबीचे अधिकारी फिरत राहिले. जेव्हा आम्हाला संकेत मिळाले तेव्हा दहशतवाद्यांना घेरण्यात आले.
दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठवणाऱ्या मालकांनाही मारले
काल झालेल्या कारवाईत, आमच्या निष्पाप नागरिकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले. सुलेमान उर्फ फैजल जाट, अफगाण आणि जिब्रान नावाच्या दहशतवाद्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला केला. घटनास्थळावरून सापडलेल्या काडतुसांची एसएफएल चौकशी करण्यात आली. कालच्या कारवाईत सापडलेल्या काडतुसांचीही तपासणी करण्यात आली आणि रायफल्सही तपासणीसाठी चंदीगडला पाठवण्यात आल्या. या सर्व तपासात हे तिघेही एकच दहशतवादी असल्याचे सिद्ध झाले. ऑपरेशन महादेवमध्ये सापडलेल्या या गोळ्या पहलगाममध्ये झाडल्या गेलेल्या गोळ्या आहेत. मी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की मोदी सरकारने दहशतवाद्यांना तसेच त्यांना पाठवणाऱ्या त्यांच्या मालकांनाही मारले. मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळात कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, असंही अमित शाह यांनी म्हटलं.