"मी आज जे काही आहे ते देवाच्या आशीर्वादामुळे आहे. देवाने प्रत्येक कामात मला मार्गदर्शन केले, असं अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी म्हटलं आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील 'इस्कॉन'च्या नियामक मंडळ आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद स्वामी महाराज यांच्याशी बातचित करताना गौतम अदाणी यांनी असं म्हटलं.
"मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे. आज मी जेथे पोहोचलो आहे, त्याबाबत कधी कधी डोळे मिटून विचार केल्यावर वाटतं की, माझ्या क्षमतेमुळे नाही तर देवाच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. मी जे काही करतोय त्यात देव मला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे पैसा आणि वैयक्तिक गरजा माझ्यासाठी फारशा महत्त्वाच्या नाहीत", असं गौतम अदाणी यांनी म्हटलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. अदाणी समुहाकडून महाकुंभ मेळ्याच्या संपूर्ण काळामध्ये महाप्रसाद सेवा दिली जाणार आहे, ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे.
"महाकुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 'महाप्रसाद सेवा'"
गौतम अदाणी यांनी याबाबत म्हटलं की, "कुंभ मेळा ही सेवेसाठीची ती तपोभूमी आहे जिथे सगळे हात परमार्थासाठी पुढे येतात. मला आनंद आहे की महाकुंभासाठी आम्ही इस्कॉनच्या सहकार्याने भाविकांसाठी 'महाप्रसाद सेवा' सुरू करत आहोत. या ठिकाणी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने लाखो लोकांना नि:शुल्क भोजन उपलब्ध होईल. या संदर्भात इस्कॉनचे गुरु प्रसाद स्वामी यांची भेट झाली. सेवेसाठीच्या त्यांच्या समर्पणाची शक्ती जवळून अनुभवता आली. सेवा हीच राष्ट्रभक्तीचे सर्वोच्च रुप आहे. सेवा म्हणजेच साधना, सेवा म्हणजेच प्रार्थना आणि सेवा म्हणजेच परमात्मा आहे."
( नक्की वाचा : Mahakumbh Conclave : 'महाकुंभाचा फक्त प्रयागराजला नाही तर संपूर्ण देशाला फायदा' )
"1 कोटी भाविकांना वाटणार आरती संग्रह"
कुंभमेळा हा भारतीय संस्कृती आणि धार्मिक आस्थेचा महायज्ञ असल्याचे यावेळी गौतम अदाणी यांनी सांगितले. आमच्यासाठी ही एक समाधानाची बाब आहे की आम्ही प्रतिष्ठीत संस्था गीता प्रेस बरोबर सहकार्य करत आहे. त्या माध्यमातून आम्ही आरती संग्रहाच्या जवळपास 1 कोटी प्रती कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांना मोफत देणार आहोत. सनातन साहित्याच्या माध्यमातून गेल्या 100 वर्षापासून देशाचे सेवा करणाऱ्या गीता प्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आनंद झाल्याचे गौतम अदाणी यावेळी म्हणाले. त्यांच्या चांगल्या कामासाठी आपल्याला त्यांचे आभार मानण्याचे भाग्य लाभले आहे असंही त्यांनी सांगितलं. निस्वार्थ सेवाभाव आणि संस्कृतीचे रक्षण म्हणजे एक प्रकारे राष्ट्रप्रेम असल्याचे ही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की "सेवा साधना आहे, सेवा प्रार्थना आहे, आणि सेवा हिच परमात्मा आहे."