
चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तिथे दररोज मोठ्या प्रमाणात भक् दर्शनासाठी जात आहेत. आता भाविकांनी अमरनाथ यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार आहे. ही यात्रा 9 ऑगस्टपर्यंत चालेल. चारधामप्रमाणेच अमरनाथ यात्रेला जाण्यासाठीही तुम्हाला आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे. अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे नोंदणी करू शकता. जर तुम्ही या वर्षी बर्फानी बाबांचे दर्शन घेऊ इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी
सर्वप्रथम तुम्ही श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकृत वेबसाइट jksasb.nic.in ला भेट द्या. तुम्ही तेथे यात्रेशी संबंधित कागदपत्रांच्या डिजिटल प्रती अपलोड करा. तुम्ही तेथे यात्रेसाठी स्लॉट देखील बुक करू शकता. यानंतर तुम्हाला 'यात्रा परमिट रजिस्ट्रेशन' (Yatra Permit Registration) वर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म येईल. यात यात्रेचा मार्ग, तारीख, प्रवाशाची संपूर्ण माहिती आणि वैद्यकीय माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रत अपलोड करावी लागेल. शेवटी तुम्हाला पेमेंट करायचे आहे. नंतर नोंदणी फॉर्म डाउनलोड करायचा आहे.
अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाइन नोंदणी कशी करावी
तुम्ही अमरनाथ यात्रेसाठी पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू आणि काश्मीर बँक आणि येस बँकेच्या देशभरातील कोणत्याही शाखेत जाऊन ऑफलाइन नोंदणी करू शकता. तुम्हाला फक्त येथे जाऊन KYC आणि हेल्थ सर्टिफिकेट जमा करावे लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला यात्रेसाठी एक पास दिला जाईल, तो तुम्हाला अमरनाथच्या प्रवेशद्वारावर दाखवावा लागेल.
ट्रेंडिंग बातमी - Uddhav Raj News: 'हो आम्ही घाबरलोय'! ठाकरे एकत्र येणार यावर राणे थेट बोलले
अमरनाथ यात्रा नोंदणीसाठी काय आवश्यक आहे?
पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ज्या राज्यात राहता, तेथील अधिकृत डॉक्टरांचे सत्यापित आरोग्य प्रमाणपत्र. या गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर तुमच्या अमरनाथ यात्रेत कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे ही कागपत्र आतापासून एकत्र करायला सुरूवात करात. त्यातून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन करु शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world