Doctor Death News: भरधाव कारची ट्रकला धडक आणि क्षणातच सर्व संपलं... चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा जागीच मृत्यू

Doctor Death News: कारच्या अपघातात चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Amroha Road Accident: भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा जागीच मृत्यू
  • कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला
  • अपघातग्रस्त वाहनाचे कापून मृतदेत बाहेर काढण्यात आला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Doctor Death News: भीषण अपघातात चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा जागीच मृत्यू झालाय. हे चार तरुण कारने प्रवास करत होते, यादरम्यान त्यांच्या भरधाव कारची रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली आणि त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (3 डिसेंबर 2025) ही घटना घडलीय.    

मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप तास लागले

मृत पावलेले चारही तरुण वेंकटेश्वरा विद्यापीठातून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा जिल्ह्यातील रजबपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील उड्डाणपुलाजवळ बुधवारी रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वेगवान कार आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप तास लागले.  

गाडीचे भाग कापावे लागले

मृत पावलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर मेरठहून गाझियाबादच्या दिशेनं प्रवास करत होते. प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला उभा असलेला सामानाने भरलेला ट्रक त्यांना दिसला नसावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. भीषण अपघातात या चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या गाडीचा पूर्णपणे चुराडा झालाय. अपघातग्रस्त वाहनाचे भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय. 

Doctor

ट्रक चालक फरार

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारमध्ये अडकलेले मृतदेह तातडीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने महामार्गावरुन हटवण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, कोणताही सिग्नल न देताच ट्रक रस्त्यावर पार्क करण्यात आला होता. अपघात होण्यामागे हेच कारण असल्याचं म्हटलं जातंय.

Advertisement

रिपोर्ट्सनुसार, अमरोहा जिल्ह्यात बुधवारी दोन अपघात झाले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. रजबपूरमध्ये चार तर गजरौला येथे दोन जणांचा मृत्यू झालाय. गजरौला येथे बाइकवर असलेल्या दोन जणांना ट्रकने चिरडल्याने दुर्घटना घडली.