Anaya Bangar : ...तर बाळाचे बाबा अन् आईदेखील अनायाच! अनाया बांगरचा मोठा निर्णय; देशातील पहिलंच प्रकरण?

नुकतच थायलँडमध्ये अनायाने जेंडर अफर्मिंग सर्जरी केली. आता सोशल मीडियावर तिच्या आई-बाबा होण्याची चर्चा सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

anaya bangar surgery : माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनायाचा जन्म झाला तेव्हा ती मुलगा आर्यन होती. मात्र कालांतराने तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. नुकतच थायलँडमध्ये अनायाने जेंडर अफर्मिंग सर्जरी केली. सध्या तिची प्रकृती सुधारत आहे. अनायाने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला असून यासोबत एक भावुक करणारी नोटही लिहिली आहे. दरम्यान अनायाबद्दल एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. 

मुलाचे बाबा अन् आईदेखील अनायाच!

अनाया बांगर हिची जेंडर अफर्मिंग सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. आता अनाया बांगर सरोगसीद्वारे आई होऊ शकते. गर्भाशय नसल्याने शारिरीक संबंधाद्वारे ती आई होऊ शकत नाही. मात्र स्त्री प्रमाणे शरीरसंबंध ठेऊ शकते. विशेष म्हणजे यापूर्वीच अनाया बांगरने स्वत:चे शुक्राणू गोठवून ठेवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. म्हणजे भविष्यात स्वतःच्या शुक्राणूंपासून तिला जैविक अपत्य होऊ शकतं. जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा अनाया त्या बाळाची आई आणि बाबा दोन्ही असेल. कदाचित इतिहासातील ही पहिलीच घटना असेल अशीही चर्चा सुरू आहे. 

Advertisement

सोशल मीडियावर चर्चा...

एका वृत्त माध्यमानुसार, राईज अँड फॉल या रिअॅलिटी टेलिव्हिजन (२०२५) शोदरम्यान अनायाने आपल्या सहस्पर्धकाशी बोलताना मातृत्वाबद्दलचा उल्लेख केला होता. यामध्ये तिने शुक्राणू गोठवून ठेवल्याचंही म्हटलं आहे. तिने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे भविष्यात तिला बाळ हवं असेल तर जैविक अपत्य होऊ शकतं.  सोशल मीडियावर यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी हे प्रकरण अनोखं असेल तर असं म्हटलं आहे. तर काहींनी इतिहासातील ही पहिलीच घटना असेल जिथं आई आणि बाबा एकच व्यक्ती असेल असं म्हटलं आहे. 

अनाया बांगर हिने घेतलेल्या निर्णयामुळे समाजातून तिचं मोठं कौतुक केलं जात आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय मोठा होता. समाजाच्या द्वेषाकडून दुर्लक्ष करीत तिने स्वत:च्या मनाचं ऐकलं. यावेळी कुटुंबाने मोठा आधार दिल्याचं अनायाने सांगितलं.