Andhra Pradesh Temple Accident : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये श्री वराहलक्ष्मी नरसिंहा स्वामी मंदिरात भिंत कोसळल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंदनोत्सवमदरम्यान ही भिंत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदनोत्सवमसाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जमा झाली होती, त्यावेळी अचानक 20 फूट उंचीची एक भिंत कोसळली. यानंतर मंदिरात गोंधळ उडाला.
नक्की वाचा - Pune Video : 'हॉर्न का वाजवला?' पुण्यात भररस्त्यात तुफान राडा; कपडे काढून चालकाला धू धू धुतलं
याबाबत जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद म्हणाले, जखमींना रुग्णालयात हलविण्यात येत आहे. अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्री वराहलक्ष्मी नरसिंहा स्वामी मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. मंगळवारी दुपारच्या वेळेत ही घटना घडली. त्यावेळी गर्दी मोठी असल्याने मोठ्या संख्येने लोक यात जखमी झाले. या दुर्घटनेत किती जण जखमी झालेत ही संख्या अद्याप कळू शकलेली नाही.