आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलममध्ये शनिवारी एकादशीच्या पवित्र दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दर्शन आणि पुजेसाठी आले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत. अपघातात कमीत कमी ९ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
चेंगराचेंगरीचे अंगावर काटा आणणारे दृश्य
या चेंगराचेंगरीचे अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले आहेत. काही भाविक मंदिराच्या आवारात बेशुद्ध पडलेले आहेत. एका व्हिडिओमध्ये मंदिराच्या आवारात दोन महिला भाविक बेशुद्धाअवस्थेत दिसत आहेत. काही भाविकांना सीपीआर देऊन त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिराच्या आवारात सर्वत्र सामान विखुरलेले आहे. चेंगराचेंगरीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
भाविकांचा वाचविण्याचा प्रयत्न...
तामिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं, या घटनेतील जखमींना तत्काळ मदत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलं, श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मला खूप दुःख झालं आहे. या दुर्दैवी घटनेत भाविकांचा मृत्यू झाला हे खूप दुःखद आहे. मी पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आणि चेंगराचेंगरीच्या ठिकाणी मदत कार्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.