- आंध्र प्रदेश के अनंतपुर में 17 महीने की बच्ची अक्षिता गर्म दूध में गिरने से झुलस गई और बाद में उसकी मौत हो गई.
- बच्ची की मां कृष्णवेणी स्कूल में सुरक्षा गार्ड के रूप में कार्यरत हैं और बच्ची उनके साथ स्कूल आई थी.
- बच्ची खेलते-खेलते रसोई में पहुंची जहां खौलता हुआ दूध पंखे के नीचे ठंडा हो रहा था, उसमें गिर गई
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बुक्करायसमुद्रम मंडलमधील कोरापाडुजवळ असलेल्या एका शाळेत, 17 महिन्यांची चिमुकली उकळत्या दुधाच्या मोठ्या पातेल्यात पडून भाजली गेली आणि उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. स्वयंपाकघरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
अक्षिता असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिची आई कृष्णवेणी या गुरुकुल शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. अक्षिता आईसोबत शाळेत आली होती. तिची आई कामात व्यस्त असताना अक्षिता तिथे खेळत होती. खेळता-खेळता ती शाळेच्या स्वयंपाकघरात गेली. विद्यार्थ्यांना देण्यासाठी ठेवलेले खवळते दूध स्वयंपाकघरात पंख्याखाली थंड होण्यासाठी ठेवले होते.
अक्षिता दुधाच्या या मोठ्या पातेल्याजवळ खेळत होती. तिथे एक मांजर आले, ज्याला पाहण्यासाठी अक्षिता तिच्या मागे गेली. याच गडबडीत, दुर्दैवाने ती गरम दुधाच्या भांड्यात पडली. दुधात पडताच भाजल्यामुळे ती चिमुकली वेदनेने मोठ्याने ओरडू लागली. तिने भांड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही.
रडण्याचा आवाज ऐकून तिची आई कृष्णवेणी तात्काळ धावत स्वयंपाकघरात पोहोचल्या. त्यांनी त्वरित मुलीला गरम दुधातून बाहेर काढले आणि तिला घेऊन अनंतपूरच्या सरकारी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर, पुढील चांगल्या उपचारांसाठी मुलीला लगेच कुरनूल येथील सरकारी रुग्णालयात हलवण्याची शिफारस केली. मात्र, अक्षिता खूप जास्त भाजली असल्यामुळे उपचारादरम्यान तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.