
समुद्राच्या पोटात काय लपलंय याचा अंदाज करणे देखील कठीण आहे. असाच एक दुर्मिळ मासा खोल समुद्रात सापडला आहे. समुद्राच्या 2 हजार मीटर खाली एक अतिशय वेगळा मासा सापडला आहे. या माशाचे नाव अँगलरफिश आहे आणि ते दिसायला इतर माशापेक्षा काहीसा वेगळा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या माशाचा पहिला फोटो कोंड्रिक टेनेरिफ या स्वयंसेवी संस्थेच्या संशोधकांनी काढले होते. या माशाचे वैज्ञानिक नाव मेलानोसेटस जॉन्सोनी आहे. अँगलरफिश माशाबद्दल काही अतिशय गोष्टी जाणून घेऊयात.
अँगलरफिशची खासियत
अँगलरफिशच्या डोक्यावर अँटेनासारखे काहीतरी असते, ज्याचा वापर तो भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी आणि आमिष दाखवण्यासाठी म्हणून करतो. काही अँगलरफिशच्या ल्युअर्समध्ये बायोल्युमिनेसेंट बॅक्टेरिया असतात, जे शिकार आकर्षित करण्यासाठी निळा-हिरवा प्रकाश सोडतात.
(नक्की वाचा- Ruddy Crake Bird : शहरीकरणामुळे अधिवास टिकवण्यासाठी संघर्ष; लाजऱ्या 'फटाकडी'च्या विश्वाची थक्क करणारी सफर )
अँगलरफिशचे दात मोठे, तीक्ष्ण असतात जे शिकार पकडण्यासाठी आणि खाण्यासाठी उपयोगी पडतात. मादी अँगलरफीश नरांपेक्षा आकाराने खूप मोठ्या असतात. नर अँगलरफिश खूप लहान असतात आणि ते मादीच्या शरीराला चिकटून राहतात. नर अँगलरफिश मादीसाठी शुक्राणूंचा स्रोत म्हणून काम करतात. एक मादी अँगलरफिश एका वेळी दहा लाख अंडी घालू शकते.
(नक्की वाचा- Tele Phobia : फोनवर बोलताना भीती वाटतीय, तुम्हाला असू शकतो टेली फोबिया! तो कसा ओळखणार?)
अँगलरफिश अटलांटिक आणि अंटार्क्टिक महासागरांच्या खोल पाण्यात राहतात. अँगलरफिश आपल्या भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी त्याच्या अँटेनाचा वापर करतो आणि नंतर त्याच्या मोठ्या दातांनी त्याला पकडतो. अँगलरफिश सहसा एकटे असतात. अँगलरफिशमध्ये प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते, जी त्यांना संवाद साधण्यास, भक्ष्यांना आकर्षित करण्यास आणि भक्षकांपासून पळून जाण्यास मदत करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world