Elephant Shocking Video Viral : माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये दाखल केल्यापासून तमाम हत्तीप्रेमींना रडू कोसळलं होतं. हत्तींची विशेष काळजी घेतल्यावर आणि त्यांना सुरक्षीत ठेवलं, तर हे प्राणीही माणसांशी अतूट नातं जोडतात. हत्तीही माणसांसोबत भावनिक होतात आणि त्यांच्यासोबत खेळतातही. पण एका व्यक्तीने जंगलात असलेल्या हत्तीसोबत असं कृत्य केलं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. या व्यक्तीने हत्तीची शेपटी ओढून त्याला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. शेपटी ओढल्यानंतर हत्तीने घनदाट जंगलात असं काही केलं, जे पाहून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा माणूस नाही, राक्षसच आहे
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जंगलात असलेल्या एका भल्यामोठ्या हत्तीची शेपटी ओढतो. तर कोणी हत्तीवर दगड फेकतो. काही लोकांनी शांत असलेल्या हत्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप उसळला आहे. व्हिडीओत दिसतंय की, एक शांत हत्ती जंगलातून आरामत जात असतो, तेव्हा एक व्यक्ती त्याच्यामागे येतो आणि हत्तीची शेपटी ओढतो.
हे ही वाचा >> Palghar CCTV Video : ऑफिसला लवकर पोहोचण्याची घाई नडली! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा पाय घसरला अन् नंतर..
त्यानंतर हत्ती खूप घाबरतो आणि त्या व्यक्तीचे मागे जाण्याचा प्रयत्न करतो.पण तो व्यक्ती हत्तीच्या तावडीतून कसाबसा निसटतो. पण त्यानंतरही काही लोक हत्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक हत्तीवर दगड फेकतात आणि त्याच्यासमोर जोरजोरात ओरडतात. तर दुसरीकडे काही लोक या हत्तीचा मजाक उडवतात आणि घटनेचा व्हिडीओ बनवतात. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना तेव्हा घडली, जेव्हा हत्तीचा कळप अन्नाच्या शोधात मिदानपूर जिल्ह्यातील जवळच्या परिसरात भटकत होता.
इथे पाहा हत्तीचा व्हायरल व्हिडीओ
नक्की वाचा >> Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!
हत्तीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @streetdogsofbombay नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय, खरा जंगली कोण आहे?, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, अशा लोकांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. दूसऱ्या यूजरने म्हटलं, प्राणी बोलू शकत नाहीत. म्हणून माणसं त्यांना त्रास देतात.