तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी ! प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड

Tirupati Balaji : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या सरकारवर आरोप केले होते. रेड्डी यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आंध्र प्रदेशातील सत्तारुढ तेलुगु देसम पक्षानं याबाबतचा CALF प्रयोगशाळेचा अहवाल सार्वजनिक केला आहे. या अहवालामध्ये तिरुपती बालाजीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी आढळली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

CALF प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तुपामध्ये फिश ऑयल, बीफ टॅलो आणि काही प्रमाणात डुकराची चरबी आढळली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी यापूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारवर तिरुपती मंदिरातीाल लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा दावा केला होता. YSR सरकारनं मागील पाच वर्षांमध्ये तिरुमाला मंदिराचं पावित्र्य धुळीस मिळवलंय, असा दावा नायडू यांनी केला होता. त्यांनी अन्नदानमच्या (मोफत भोजन) गुणवत्तेमध्ये तडजोड केली. त्याचबरोबर तिरुमालामधील पवित्र लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, असं नायडू म्हणाले होते. 

 ( नक्की वाचा : पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तानला मोजावी लागेल किंमत, 64 वर्ष जुन्या कराराबाबत भारताचा निर्णय )
 

'आम्ही आता तिरुमला लाडूच्या प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करत आहोत. TDP सरकार तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) पावित्र्याच्या संरक्षणासाठी कठोर मेहनत करत आहेत,' असा दावा नायडू यांनी केला.

YSR काँग्रेसचा नायडूंवर पलटवार

तेलुगु देसम पक्षानं केलेल्या आरोपांना YSR काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिरुमलाचे पवित्र मंदिर आणि कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देऊन मोठं पाप केलं आहे. नायडू यांचं वक्तव्य अत्यंत लाजीरवाणं आहे. कोणतीही व्यक्ती या प्रकारचे शब्द वापरु शकत नाही. हे आरोप करु शकत नाही, ' असा पलटवार YSR काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार YV सुब्बा राव यांनी केला आहे.  
 

Topics mentioned in this article