iPhone ची निर्मिती करणाऱ्या Apple ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली उत्पादने अमेरिकेमध्येच बनवा अशा धमकीवजा इशारा दिला होता. आता ट्रम्प यांनी एक पाऊल पुढे टाकत Apple ला आणखी एक धमकी दिली आहे. जर अमेरिकेबाहेर बनवलेले फोन अमेरिकेत आणून विकले तर 25 टक्के टॅरीफ लावू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी Apple ने आयफोनचे उत्पादन चीनऐवजी भारतामध्ये करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी टॅरीफ वॉर सुरू केले म्हणजेच त्यांनी विविध देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर जबरदस्त कर लावले. भारतही या तडाख्यातून सुटलेला नाही. आतापर्यंत ट्रम्प यांच्या डोळ्यात चीन सलत असल्याचं वाटत होतं, मात्र चीनसोबत अमेरिकेची व्यापारी वाटाघाटी सुरू असून अमेरिकेचे नेमके चालले तरी काय आहे असा प्रश्न विविध देशांना पडला आहे.
चीनहा बेभरवरशी असल्याने, तो विविध मार्गांनी गोपनीय माहिती चोर असल्याने अनेक देशांनी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमध्ये करण्यात येत असलेले उत्पादन अन्य देशांत करण्याचा निर्णय घेतला होता. चीनपेक्षा इतर देशांत उत्पादन करणे हे या कंपन्या आणि देशांना परवडणारे आहे कारण ते स्वस्त पडते. Apple नेही याच कारणामुळे iPhone चे उत्पादन भारतामध्ये करण्याचं ठरवलं होतं. ट्रम्प यांना मात्र हा निर्णय आवडलेला नाही. त्यांनी TruthSocial या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, मी Apple चे CEO टीम कुक यांना आधीच सांगितले होते की अमेरिकेत विकले जाणारे iPhone हे अमेरिकेतच बनलेले असणं गरजेचं आहे, ते भारतात किंवा इतर देशांत बनलेले असता कामा नयेत. जर Apple ने इतर देशात तयार केलेले iPhone भारतात विकले तर त्यांच्यावर 25 टक्के टॅरीफ लावण्यात येईल.
नक्की वाचा :नवऱ्याचे तरुणीच्या आईसोबत गुपचूप ढाक्कुमाकुम, DNA टेस्टमधून धक्कादायक खुलासा
ट्रम्प यांच्या इशाऱ्यापुढे Apple झुकली तर iPhone च्या किंमती बेसुमार वाढतील आणि त्यांचा खप कमी होईल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. यामुळे या कंपनीलाच मोठे आर्थिक नुकसान झेलावे लागेल अशी भीती आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला भारतापेक्षा चीनवर मोठा टॅरीफ लावला होता. यामुळे Apple ने iPhone ची मोठी खेप भारतातून अमेरिकेत आणली होती. यानंतर ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरीफला काही दिवसांची स्थगिती दिली होती.