AstraZeneca चा मोठा निर्णय; कोविशील्डच्या दुष्परिणामांनंतर उचललं मोठं पाऊल 

ब्रिटेनची फार्मा कंपनी AstraZeneca ने जगभरातील आपल्या कोविड-19 लसीच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

AstraZeneca या कंपनीने जगभरातून कोरोना लसीच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. AstraZeneca ने 2020 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून कोरोना लसीची निर्मिती केली होती. या फॉर्म्युल्याचा वापर करीत सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड नावाच्या लसीची निर्मिती केली होती. काही दिवसांपूर्वीच कंपनीने या लसीमुळे काहींना दुष्परिणामांना सामोरं जावं लागल्याचं मान्यही केलं होतं, त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, भारताने आतापर्यंत 220 कोटींहून अधिक लसी वितरित केल्या आहेत. 

ब्रिटेनची फार्मा कंपनी AstraZeneca ने जगभरातील आपल्या कोविड-19 लसीच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशील्ड या लसीचाही समावेश आहे. कंपनीने मंगळवारी 7 मे रोजी दिलेल्या माहितीनुसार,  बाजारात आवश्यकतेपेक्षा जास्त लसी उपलब्ध आहेत. यासाठी कंपनीने बाजारातील सर्व लसी परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीमुळे रक्ताच्या गाठी तयार होणं आणि रेड प्लेटलेट्सची संख्या कमी होणं यांसारखे साइड इफेक्ट झाल्याचं कंपनीने मान्य केलं होतं. 

लंडनमध्ये या कंपनीविरोधात 100 मिलियन पाउंडचा खटला सुरू आहे. या खटल्याशी संबंधित प्रकरणात कंपनीने लसीमुळे दुर्मीळ प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचा (TTS) धोका होऊ शकतो हे मान्य केलं आहे. 

नक्की वाचा - कोविशील्ड लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दाम्पत्याचा आरोप; अ‍ॅस्ट्राजेनेका कंपनीविरोधात आक्रमक

या लसीमुळे रक्त गोठणे आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणे आदी दुष्परिणाम दिसत होते. ब्रिटनमध्ये यामुळे सुमारे 81 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र लस उत्पादक कंपनीने कोविशील्ड मागे घेण्याचा निर्णय न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित असल्याचे नाकारले आहे