डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात राहुल गांधींनी सोडलं मौन, स्थानिक प्रशासनावर केला गंभीर आरोप

Doctor Murder Case : कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरबाबत घडलेल्या क्रूर प्रकाराबाबत देशभर संतापाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
R
मुंबई:

कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरबाबत घडलेल्या क्रूर प्रकाराबाबत देशभर संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरील मौन सोडलं असून याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट केलीय. त्यामध्ये राहुल म्हणाले की. 'कोलकातामधील ज्युनिअर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या भयंकर प्रकारानं संपूर्ण देश स्तब्ध आहे. तिच्यासोबत घडलेल्या क्रूर आणि अमानवी घटनेमुळे डॉक्टर्स आणि महिलांमध्ये असुरक्षेची भावना आहे. पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी आरोपीला वाचवण्याचे सुरु असलेले प्रयत्न हॉस्पिटल आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करतात.  

( नक्की वाचा : महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश )
 

मेडिकल कॉलेजसारख्या जागी देखील डॉक्टर्स सुरक्षित नाहीत हा विचार करण्यास या प्रकरणानं भाग पाडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पालक त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर कसं पाठवणार? निर्भया खटल्यानंतर तयार झालेले कठोर कायदे या प्रकराचे गुन्हे रोखण्यात का अपयशी आहेत?

हाथरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकातापर्यंत महिलांच्या विरोधात सातत्यानं होणाऱ्या घटनांवर सर्व पक्ष, वर्ग यांनी एकत्र येऊन गंभीर विचारविनिमय करुन ठोस उपाय करावा लागेल. मी या खडतर परिस्थितीमध्ये पीडित परिवारासोबत उभा आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळावा. त्याचबरोबर दोषींना या प्रकारातील घटनांमध्ये उदाहरण ठरावं अशी शिक्षा देण्यात यावी. 

Advertisement

कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाता तपास सीबीआयकडं सोपवण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयानं मंगळवारी दिले. प्रशासन पीडित परिवारासोबत आहे, असं दिसत नाही,  या शब्दात कोर्टानं प्रशासनाला फटकारलं होतं. 
 

Advertisement