Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराच्या पैशांवर डल्ला मारणारे 6 संशयित कोण? SIT चौकशीत मोठे मासे अडकणार!

Ayodhya Ram Mandir Donation Scam: अयोध्या येथील राम मंदिराला दान म्हणून मिळालेल्या पैशांची चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

जाहिरात
Read Time: 4 mins
Ram Mandir Donation Scam
मुंबई:

Ayodhya Ram Mandir Donation Scam: अयोध्या येथील राम मंदिराला दान म्हणून मिळालेल्या पैशांची चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  राम मंदिराच्या देणगीतून 7 कोटी रुपयांची चोरी झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी अयोध्या येथील पोलीस ठाण्यात चोरीच्या 3 तक्रारी दाखल करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्यासह एसआयटीचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. राम मंदिर ट्रस्टच्या संशयित कमचाऱ्यांची सातत्याने चौकशी केली जात आहे.

देणगीच्या चोरी प्रकरणातील 6 संशयितांवर सध्या चौकशीचा फास आवळला गेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनेही यावर प्रतिक्रिया दिली असून, एसआयटी या प्रकरणाच्या मुळाशी जाईल आणि कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Advertisement

रामशंकर यादव उर्फ टिन्नू 

रामशंकर यादव उर्फ टिन्नू हे आधी चंपत राय यांचे ड्रायव्हर होते आणि आता त्यांचे सहकारी असल्याचे सांगितले जाते. अयोध्या आणि लखनऊमध्ये त्यांच्या नावावर सुमारे 50 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा केला जात आहे. राम मंदिरापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर त्यांचे वडीलोपार्जित घर आहे. 

तपास यंत्रणेने त्यांच्या घरातून सोने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. मंदिराच्या देणगी चोरीत त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक भूखंड खरेदी केले असून 5 ते 6 महागड्या रेस्टॉरंटमध्ये त्यांची भागीदारी असल्याचाही आरोप आहे. दुसरीकडे, टिन्नू यांनी आपला देणगीच्या पैशांशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

आपण बऱ्याच काळापासून विश्व हिंदू परिषदेत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. 50 कोटी रुपयांच्या संपत्तीचा दावा खोटा असल्याचे सांगत आपल्याकडे फक्त एक गेस्ट हाऊस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे टिन्नू यांनी म्हटले आहे.

( नक्की वाचा : RSS ला पैसा नक्की कुठून मिळतो? गुरुदक्षिणेवर टॅक्स का लागत नाही? कसं चालतं संघाचं काम? वाचा सर्व माहिती )
 

नोटा मोजणारा मनिष यादव

टिन्नू यादव यांचा पुतण्या मनिष यादव हानोटा मोजण्याचे काम करत असे. देणगीची चोरी आणि अपहारामध्ये त्याचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याच्या माहितीवरून 36 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. एसआयटी आता मनिषचीही चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

व्यवस्थापक गोपाळ राव 

गोपाळ राव हे राम मंदिराच्या व्यवस्थापकांपैकी एक आणि विशेष आमंत्रित सदस्य आहेत. मंदिराची देखभाल आणि साफसफाईची जबाबदारी तेच सायंभालतात. दानपेटीतून मिळणारी देणगीही त्यांच्याच नियंत्रणाखाली असते. त्यांच्यावर चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. 

गोपाळ राव यांनी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. आपण स्वतःच ट्रस्टसोबत एसआयटी तपासाची मागणी केली होती, असा दावा राव यांनी केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Titan Story: टायटनची घड्याळे इतर ब्रँड्सच्या तुलनेत महाग का असतात? वेब सीरिजच्या चर्चेत समजून घ्या नेमके कारण )

मेहुण्यांच्या जोडीची झपाट्याने बदलली आर्थिक स्थिती

लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा हे दोघे नात्याने मेहुणे असून ते दानपेटीतील पैसे मोजणाऱ्या पथकात होते. गेल्या काही वर्षांत या दोघांची आर्थिक स्थिती झपाट्याने बदलली. अनुकल्पचे गावात फार्म हाऊस असून त्याने अयोध्येत 65 लाख रुपयांचे घर खरेदी केल्याचे सांगितले जाते. 

लवकुश फैजाबादमध्ये घर बांधत होता आणि त्याच्याकडून 10 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मंदिराची देणगी आणि दानामध्ये या दोघांनी मोठा फेरफार केल्याचा आरोप आहे. मात्र, कुटुंबियांच्या मते हे दोघेही निर्दोष आहेत. सध्या एसआयटी या दोघांची चौकशी करत आहे.

दागिने सांभाळणारे केडी तिवारी 

केडी तिवारी यांच्याकडे मंदिरातील दानात येणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी 1.5 कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. 5 कोटी रुपयांची संपत्ती जमा केल्याप्रकरणी ते सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यावर बोलताना तिवारी यांनी सांगितले की, ते अनेक शाळांमध्ये शिक्षक राहिले आहेत. त्यांचा मोठा मुलगा हवाई दलात होता आणि आता आयबीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. 

दुसरा मुलगा सैन्यातून निवृत्त होऊन यूपी पोलिसात सब-इन्स्पेक्टर आहे. त्यांच्याकडे जे काही आहे ते कुटुंबाचे आहे, त्यामुळे हवे तर या संपत्तीची सर्व चौकशी करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

ट्रस्टचे संस्थापक सदस्य डॉ. अनिल मिश्रा 

या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर अनिल मिश्रा यांचेही नाव समोर आले आहे. ते राम मंदिर ट्रस्टचे संस्थापक सदस्य आहेत. राम मंदिराचे बांधकाम आणि देणगीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अयोध्येतील जलकल जवळ महानगरपालिका परिसरात त्यांचे घर आहे. अवधपुरी येथेही त्यांचे नवीन घर बांधले जात असून, तिथे लिफ्ट देखील लावली जात असल्याचा दावा केला जात आहे. मंदिरात येणारी देणगी आणि त्याच्या व्यवस्थापनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Topics mentioned in this article