Ram Mandir : प्रतीक्षा संपली! अयोध्येतील भव्य राम मंदिराचं बांधकाम लवकरच पूर्ण होणार, 'या' तारखेपासून घ्या दर्शन

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी राम मंदिराच्या निर्मितीबाबत मोठी माहिती दिली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी राम मंदिराच्या निर्मितीबाबत मोठी माहिती दिली आहे. राम मंदिराचे काम याचवर्षी 5 जूनपर्यंत पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर राम मंदिर परिसरातील अन्य मंदिर सर्व भाविकांसाठी खुले केले जातील. मंदिर परिसरातील महर्षी वाल्मिकी, श्री वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, आहिल्याजी, निषादराज महाराज, शबरी माता आणि अगस्त्य मुनींच्या मूर्तीची स्थापना झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी होणार पूजा ? 

या सर्व मूर्तींची पूजा 5 जून रोजी होणार आहे. त्यानंतर हे मंदिरं सर्वांसाठी खुले होतील. राम मंदिर आणि मंदिराच्या परिसरातील 6 मंदिरांची पूजा 5 जून रोजी होईल, असं मिश्र यांनी सांगितलं. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय सविस्तर कार्यक्रमाची घोषणा करतील, असं त्यांनी सांगितलं. 

5 जून नंतर एक किंवा दोन दिवसांनी मंदिर परिसरातल्या वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन घेता येईल, असं मिश्र यांनी सांगितलं. 

मंगळवारी सकाळी वैशाख शुल्क द्वितीयाच्या दिवशी (29 एप्रिल) सकाळी 8 वाजता राम मंदिराच्या मुख्य शिखरावर 42 फुट ऊंच ध्वजदंड बसवण्यात आला. ही प्रक्रिया सकाळी 6.30 वाजता सुरु झाली आणि दीड तासांमध्ये पूर्ण झाली.   

राम मंदिराच्या मुख्य शिखरावरील 42 फुट ऊंच ध्वजदंड लांबहून दिसतो. हा ध्वजदंड खास पद्धतीनं डिझाईन करण्यात आला आहे. मंदिराची भव्यता आणि पवित्रतेला साजेसा हा ध्वजदंड आहे. याच्या निर्मितीसाठी इजिंनिअर्स आणि कारगिरांच्या टीमनं मोठी मेहनत घेतली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'राजाचं कर्तव्य आहे की...' पहलगाम हल्ल्यानंतर सरसंघचालकांचा जाहीर सल्ला )
 

2020 मध्ये सुुरु झाली होती निर्मिती

श्रीराम जन्मभूमीच्या निर्मितीचे कार्य 2020 मध्ये सुरु झाले होते. आता हे शेवटच्या टप्प्यात आहे. गर्भगृह आणि मुख्य संरचनेचं काम यापूर्वीच तयार झालं आहे. ध्वज दंडाच्या स्थापनेनंतर मंदिराचे बाह्य स्वरुप अधिक आकर्षक झाले आहे. भक्तांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात दर्शन, पूजा आणि अन्य व्यवस्था सातत्यानं चांगल्या केल्या जात आहेत.
 

Topics mentioned in this article