
Mohan Bhagwat on Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त वातावरण आहे. पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवर संघानं (RSS) 'NDTV मराठी मंच' या कार्यक्रमात केली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नाव न घेता जाहीर सल्ला दिलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले सरसंघचालक?
नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. या कार्यक्रमात ते म्हणाले, 'अहिंसा हा आपला मूळ स्वभाव आहे. पण, काही जण बिघडलेले आहेत. मी मुंबईमध्ये रावणाचा उल्लेख केला होता. रावणाकडं सर्व काही होतं, पण त्याचं मन अहिंसेच्या विरोधात होते. त्यामुळे श्रीरामानं रावणाचा वध केला.
( नक्की वाचा : 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी )
त्याचपद्धतीनं गुंडांकडून मार न खाणे हा आमचा धर्म आहे. त्यांना धडा शिकवणे हा आपला धर्म आहे. आपण शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाहीत. पण, ते त्यांच्या धर्माचं पालन करत नाहीत. त्या परिस्थितीमध्ये प्रजेचं संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. प्रजेचं रक्षण करण्यासाठी राजा जी पाऊलं उचलेल ती लोकं लक्षात ठेवतील,' असा जाहीर सल्ला भागवत यांनी दिला.
#WATCH | At an event in Delhi, a two-minute silence was observed by RSS chief Mohan Bhagwat and others to honour the innocent lives lost in the Pahalgam terror attack#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/k9ZBqyzBXC
— ANI (@ANI) April 26, 2025
भारताची ताकद दाखवून द्या
दरम्यान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यापूर्वी मुंबईतील कार्यक्रमातही याच पद्धतीनं मागणी केली होती. 'देश शक्तिशाली आहे हे दाखविण्याची वेळ आली आहे. ही लढाई कोणत्याही समाजांमधली नाही तर धर्म आणि अर्धमाची आहे. काश्मीरमध्ये दहशतवादांच्या कृत्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, रावणाला मारण्याशिवाय रामाकडे पर्याय नव्हता. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता धर्म. त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो,' असं भागवत यांनी सांगितले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world