बंगळुरूमधील बहुचर्चित रॅपिडो बाइक टॅक्सी मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. नुकतच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वेगळाच प्रकार दिसून येत आहे. या सीसीटीव्हीमध्ये ज्या तरुणीने रॅपिडो चालकावर मारहाणीचा आरोप केलाय तिनेच आधी चालकावर हात उचलला होता. या प्रकरणात रॅपिडो चालक आणि तरुणीने या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र दोघांचं म्हणणं वेगवेगळं आहे.
ही घटना शुक्रवारी बंगळुरूच्या जयनगर भागातील आहे. रॅपिडो चालक सुहारने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ती वारंवार गाडी थांबवायला सांगत होती. मी रस्त्याच्या मधोमध होतो. त्यामुळे पुढे ऑफिसच्या जवळ रस्त्याच्या किनाऱ्यावर गाडी थांबवली. त्यानंतर तरुणीला राग ईला आणि माझ्याशी मोठ्या आवाजात बोलू लागली. तिला मला विचारलं, तू शिकलेला आहेस का, रस्ता कळतो की नाही. यानंतर जेव्हा मी पेमेंट बद्दल विचारलं तर ती मला शिव्या देऊ लागली. नंतर ती माझी कॉलर पकडण्याचा प्रयत्न करू लागली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मला टिफिन बॉक्सने मारू लागले. यानंतर प्रत्युत्तरात मी तिला कानशिलात लगावली.
श्रेयाचं काय आहे म्हणणं?
श्रेयाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, तिने स्वत:चं संरक्षण करताना प्रतिक्रिया दिली होती. चालक गुगल मॅपचा वापर करीत नव्हता आणि चुकीच्या रस्त्यावरुन घेऊन जात होता. मी त्याला जिथं थांबयला सांगितलं तर तो तिथं थांबला नाही. मला असुरक्षित वाटतं. यावर खाली उतरून मी त्याला म्हटलं की, जर कन्नड येत नसेल तर देश सोडून दे. मी त्याचा शर्ट पकडला मात्र मी त्याला मारलं नाही. त्यानेच मला कानाखाली मारली. ज्यानंतर मी खाली कोसळले.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात रॅपिडो चालक सुहासविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.