Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?

8 मार्च 2024 रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती. या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 27 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामुळे महाराष्ट्रासह देशभरातील बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या नऊ संघटनांच्या संयुक्त मंचाने या संपाचे आवाहन केले आहे. मार्च 2024 मध्ये झालेल्या करारात मान्य होऊनही '5 दिवसांचा आठवडा' अद्याप लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

संपाचे मुख्य कारण 

पाच दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी 2015 पासून प्रलंबित आहे. सध्याच्या नियमांनुसार, बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ 5 दिवस काम असावे. 5 दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचारी दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहेत, जेणेकरून कामाच्या तासांचे नुकसान होणार नाही.

संपात कोणत्या बँका सामील आहेत?

या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांसारख्या सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश आहे. खासगी बँकांचे कामकाज सुरू राहण्याची शक्यता असली तरी, चेक क्लिअरन्स यांसारख्या सेवांवर सरकारी बँकांच्या संपामुळे परिणाम होऊ शकतो.

(क्की वाचा - कल्याण रेल्वे स्थानकात क्षणात जीव गेला असता, पण तो प्रवासी अखेर वाचला..पोलिसाचा प्रजासत्ताक दिनी होणार सत्कार)

8 मार्च 2024 रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती. या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र, वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. गेल्या 9 महिन्यांपासून सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युनियनने संपाचे हत्यार उपसले आहे.

Advertisement

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

27 जानेवारीला बँकांचे व्यवहार बंद राहतील, त्यामुळे चेक जमा करणे किंवा मोठे रोख व्यवहार आधीच करून घ्या.  संपाच्या काळात नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. संपाच्या काळात एटीएममधील रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे आवश्यक रोकड आधीच काढून ठेवा.
 

Topics mentioned in this article