अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan Railway Station Shocking News : कल्याण रेल्वे स्थानकात गाडीचा डब्बा आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील मधल्या गॅपमध्ये अडकलेल्या एका कर्करोग ग्रस्त व्यक्तीचे सुदैवाने प्राण वाचले. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांनी शर्थीचे प्रयत्न करून वृद्ध प्रवाशाचा जीव वाचवला. राजेंद्र शुक्ला (६०) असं जीव वाचलेल्या प्रवाशाचं नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्ला यांना उपचारासाठी ठाण्यातील मेडिसिटी रुग्णालयात जावं लागलं. त्यावेळी ते कल्याण स्टेशनवर उतरले. त्यांच्या सोबत पत्नी आणि मुलगा होता.त्यांनी एसी कोचमध्ये काही सामान ठेवले होते. तो सामान परत घेण्यासाठी ते कोचमध्ये गेले. पण त्याचदरम्यान, राजधानी एक्सप्रेस पुढे जाऊ लागली. तेव्हा शुक्ला यांनी घाई घाईत उतरण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने कोच आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकले.
नक्की वाचा >> पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? पैसे मिळतात का? सर्व माहिती वाचा
हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांचा होणार विशेष सन्मान
त्यानंतर स्थानकावर ऑन ड्युटी असलेले आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांनी धावत जाऊन शुक्ला यांना बाहेर काढले आणि त्यांचा जीव वाचवला.
कल्याण आरपीएफ स्टेशनचे प्रभारी पी.आर. मीना यांनी हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांचे कौतुक करत म्हटलं, आरपीएफ मुंबई विभागाचे वरिष्ठ डीएससी ऋषी शुक्ला यांनी या उल्लेखनीय कृत्यासाठी त्यांना सन्मान करण्याची घोषणा केली. कल्याण आरपीएफ स्टेशन प्रजासत्ताक
दिनानिमित्त १००१ रुपयांचे रोख बक्षीस देऊन हेड कॉन्स्टेबलचा सन्मानही करण्यात येणार आहे.
नक्की वाचा >> अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 5 उमेदवारांची नावं आघाडीवर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world