Instagram Post : महिलांच्या परवानगीशिवाय व्हिडीओ आणि फोटो 'इन्स्टा'वर शेअर केले, एकाला अटक

चर्च स्ट्रीट आणि बंगळुरूच्या इतर भागात महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो पोस्ट करणाऱ्या एका इन्स्टाग्राम अकाउंटविरुद्ध एका तरुणीने चिंता व्यक्त केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • Man aged 26 arrested for running Instagram account posting women’s photos without consent
  • Suspect identified as Gurdeep Singh, a hotel management graduate, currently unemployed
  • He was detained at his residence in KR Puram, Bengaluru
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली? आम्हाला नक्की कळवा.

Bengaluru News : बंगळुरूमध्ये महिलांचे व्हिडिओ आणि फोटा त्यांच्या संमतीशिवाय पोस्ट करणारे इंस्टाग्राम अकाउंट चालवणाऱ्या 26 वर्षीय पुरूषाला एका महिलेच्या व्हायरल इन्स्टाग्राम पोस्टनंतर अटक करण्यात आली. गुरदीप सिंग असे या संशयिताचे नाव आहे, जो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर आहे आणि सध्या बेरोजगार आहे. त्याला बंगळुरूच्या केआर पुरम भागातील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. 

पोलिसांनी महिलांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केलेले सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा प्रयत्नही केला, परंतु कम्युनिटी गाईडलाईन पॉसिलीमुळे ते शक्य झाले नाही. आता पोलीस हे पेज बंद करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.

(नक्की वाचा- Airline ticket prices: आता विमान प्रवास करा बिनधास्त ! 'या' मार्गावरील विमान तिकीट दरात मोठी घट)

चर्च स्ट्रीट आणि बंगळुरूच्या इतर भागात महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो पोस्ट करणाऱ्या एका इन्स्टाग्राम अकाउंटविरुद्ध एका तरुणीने चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर ही बाब उघडकीस आली. मुलीने दावा केला की तिचा व्हिडिओ देखील तिच्या संमतीशिवाय बनवण्यात आला होता. तिने पोस्ट काढून टाकण्याची विनंती केली आणि तक्रारही केली पण काहीही झाले नाही. त्या रीलमुळे तिला अश्लील मेसेजेस पाठवले जात असल्याचे मुलीचे म्हणणे आहे.

इंस्टाग्राम पेजवर रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांचे अनेक व्हिडिओ आहेत. कॅमेरा त्यांच्यावर पाहून बहुतेक महिलांना आश्चर्य वाटते. असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर असे वाटते की त्यांना ते कॅमेऱ्यात कैद झाले हे देखील माहित नव्हते. 

Advertisement

(नक्की वाचा - Pune Exclusive: मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार, अनेकांनी गाव सोडलं, व्यवसायही ठप्प, कारण काय?)

एका महिलेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती की, "संबंधित व्यक्ती चर्च स्ट्रीटवर तेथील रेलचेल टिपण्याचा बहाणा करत फिरतो. पण प्रत्यक्षात तो फक्त महिलांना फॉलो करतो आणि त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे रेकॉर्डिंग करतो. माझ्यासोबत हे घडले आहे. मला खात्री आहे की इतर अनेकांना त्यांचे चित्रीकरण झाले आहे हे माहितही नसेल. तुम्हाला इन्स्टाग्रामवर अशा प्रकारे व्ह्यूज मिळत नाहीत. मला प्रामाणिकपणे आशा आहे की हा माणूस पकडला जाईल. मी हे @blrcitypolice @cybercrimecid सोबत शेअर करत आहे, आशा आहे की ते योग्य लोकांपर्यंत पोहोचेल."