भारत बंदच्या दरम्यान पोलिसांनी SDM ना दिला लाठीचा प्रसाद! पाहा नेमकं काय घडलं? Video

Bharat Bandh : अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या विरोधात बुधवारी वेगवेगळ्या संघटनांनी भारत बंद पुकारला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पाटणा:

Bharat Bandh : अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या विरोधात बुधवारी वेगवेगळ्या संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांना  आंदोलकांवर लाठीमार करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

SDM ना प्रसाद

जमावाला नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांनी तिथं ड्यूटीवर उभ्या असलेल्या एसडीएमना देखील चुकून काठीचा प्रसाद दिला. एसडीएमनाच काठीनं मारहाण झाल्याचं लक्षात येताच अन्य पोलीस कर्मचारी तिथं धावले. त्यांनी तातडीनं त्या पोलीस कर्मचाऱ्याला दूर केलं. एसडीएमना देखील पोलिसांची काठी बसल्यानं धक्का बसला. त्यानंतर  पोलीस कर्मचाऱ्यांनी एसडीएमच्या भोवती कडं केलं. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिहारमधील अनेक भागात भारत बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवला. पाटणामध्ये बंद समर्थकांनी महेंद्रू आंबेडकर हॉस्टेलच्या जवळच्या रस्त्यावर आंदोलन केलं. बंदच्या दरम्यान कोणताही हिंसाचार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शहरात शांतता कायम ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : SC/ST मध्ये 'कोटा' अंतर्गत 'कोटा', सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अर्थ काय? )
 

पटणा-गया राष्ट्रीय महामार्गावरही बंद समर्थकांनी आंदोलन केलं. या आंदोलामुळे या मार्गावरिल वाहतूक प्रभावित झाली. सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत दिलेला आदेश रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा अशी बंद समर्थकांची मागणी आहे. 

Topics mentioned in this article