Rule Change : 1 जुलैपासून देशात होणार मोठे बदल, स्वयंपाकघरापासून ते रेल्वेच्या प्रवासावर होईल परिणाम

1 जुलैपासून होणाऱ्या या बदलांमध्ये स्वयंपाक घरात वापरले जाणारे एलपीजी सिलिंडरपासूम क्रेडिट कार्ड वापरावर लागणाऱ्या शुल्कवाढीचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Big changes From 1 July : जून महिला लवकरच संपणार आहे. एक दिवसानंतर जुलै महिन्याची सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात मोठे बदल लागू होतील. याचा परिणाम नागरिकांच्या खिशावर आणि स्वयंपाक घरातही होऊ शकतो. या बदलांमध्ये स्वयंपाक घरात वापरले जाणारे एलपीजी सिलिंडरपासूम क्रेडिट कार्डावरील शुल्कवाढीचा समावेश आहे. इतकच नाही तर 1 जुलैपासून भारतीय रेल्वेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. 

एलपीजी सिलिंडरची किंमत...

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरातील नागरिकांचं लक्ष ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडे आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींमधील बदलाकडे असतं. हे बदल थेट स्वयंपाकघरावर परिणाम करतात. जून महिन्याच्या सुरुवातील तेल कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या व्यायसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. यामध्ये एका सिलिंडरमागे 24 रुपयांनी कमी करण्यात आली होती. दरम्यान 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. 

रेल्वे भाडे वाढले, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम

1 जुलैपासून, भारतीय रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे नॉन-एसी भाडे प्रति किलोमीटर मागे 1 पैसे आणि एसीचं भाडं प्रति किलोमीटरमागे 2 पैशांनी वाढवले ​​आहे. आता तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये ओटीपी अनिवार्य आहे. १ जुलैपासून आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवरून तिकिट बुक करताना ओटीपी टाकावा लागेल. 15 जुलैपासून पीआरएस काउंटरवरून तिकिट खरेदी करण्यासाठीही ओटीपी आवश्यक असेल. याशिवाय, अधिकृत एजंट आता खिडकी उघडल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांपर्यंत तिकिटं बुक करू शकणार नाहीत.

नक्की वाचा - Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?


क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठीही मोठे बदल...

RBI च्या निर्देशानुसार १ जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी भारत बिल पेमेंट प्रमाणीचा वापर करावा लागेल. आरबीआयच्या सूचनेनुसार,1 जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) द्वारे केले जातील. याचा परिणाम फोनपे, सीआरईडी, बिलडेस्क सारख्या प्लॅटफॉर्मवर होईल. एका महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्यावर एचडीएफसी बँकेकडून 1% अतिरिक्त शुल्क आकारले जाणार  आहे. अनेक युटिलिटी बिलांवर आणि भाडे इत्यादींवर देखील 1% शुल्क आकारले जाईल.

Advertisement

नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य

सीबीडीटीने 1 जुलैपासून नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. पूर्वी कोणतेही वैध ओळखपत्र वैध होते, आता पडताळणीसाठी फक्त आधार कार्ड वापरले जाईल.

एटीएममधून पैसे काढणे देखील होणार महाग 

आयसीआयसीआय बँकेने इतर बँकांच्या एटीएममधून महिन्यातून ३ वेळेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवले ​​आहे. यासाठी  8.50 रुपये बॅलन्स चेक करण्यासाठी आणि 23 रुपये  आर्थिक व्यवहारसाठी आकारले जातील. 

Advertisement

दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाकारणार...

CAQM च्या आदेशानुसार, १ जुलैपासून, दिल्लीतील पेट्रोल पंपावर 10 वर्षे जुन्या डिझेल आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांना इंधन दिलं जाणार नाहीत. प्रदूषण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
 

Topics mentioned in this article