लहान मुलांच्या Aadhar बद्दल मोठी अपडेट, UIDAI चा महत्त्वाचा आदेश

Aadhaar Card Biometric update: ज्या मुलांचे वय 5-7 दरम्यान आहे अशा मुलांसाठी ही सूचना महत्त्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने लहान मुलांच्या आधारबाबत ( Aadhar Card Update) एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. ज्या मुलांचे वय 5-7 दरम्यान आहे आणि ज्यांचे आधारमधील बायोमेट्रिक्स तपशील अजून अद्ययावत केलेले नाहीत, त्यांनी ते त्वरित करून घ्यावे असे प्राधिकरणाने म्हटले आहे. आपल्या जवळचे आधार सेवा केंद्र शोधून तिथे ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना करण्यात आली आहे. 

( नक्की वाचा: आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वर्षभर वाढवली; नाव, पत्ता कसा बदलाल? )

SMS द्वारे पालकांना सूचना

बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अशा बालकांच्या पालकांच्या आधार कार्डाच्या नोंदणीसाठी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवायला सुरुवात केली आहे. या एसएमएसद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या बायोमेट्रिक्स अपडेट करण्यास सांगितले जात आहे.  

Advertisement

अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार ?

पाच वर्षांखालील मुलांच्या आधारसाठी नोंदणी करताना फक्त फोटो, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि पत्त्याच्या पुराव्याची कागदपत्रे लागतात. कारण पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बोटांचे ठसे आणि बुबुळाचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, कारण ते या वयात पूर्णपणे विकसित झालेले नसतात. सध्याच्या नियमांनुसार, बालकाने पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याच्या बोटांचे ठसे, बुबुळाचे बायोमेट्रिक्स आणि फोटो आधारमध्ये अद्ययावत करणे बंधनकारक आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट म्हणतात. जर मुलाचे वय 5 ते 7 वर्षांच्या दरम्यान असेल आणि हे बायोमेट्रिक अपडेट केले तर ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. मात्र, मुलाचे वय 7 वर्षांपेक्षा जास्त असल्यास या अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.

Advertisement

( नक्की वाचा: अरेच्चा! आधार कार्डाचा असाही होतो फायदा, हे 6 फायदे तुम्हाला माहिती असलेच पाहिजे  )

आधार क्रमांक निष्क्रिय होणार?

मुलांच्या बायोमेट्रिक माहितीची अचूकता आणि खात्रीशीरपणा टिकवून ठेवण्यासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. जर हे अपडेट 7 वर्षांच्या वयानंतरही केले नाही, तर सध्याच्या नियमांनुसार आधार क्रमांक निष्क्रिय केला जाऊ शकतो. आधार क्रमांक सर्वसामान्यांप्रमाणे लहान मुलांसाठीही महत्त्वाचा असतो.  शाळा प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्तीचे लाभ आणि थेट लाभ हस्तांतरण यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळवायचा असल्यास आधार क्रमांक अत्यावश्यकत आहे.  म्हणूनच, पालक किंवा बालकांचा सांभाळ करणाऱ्यांनी त्यांच्या मुलांचे बायोमेट्रिक्स आधारमध्ये प्राधान्याने अपडेट करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement