Bihar News: चिखल पाहून खासदार थेट कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसले, पूरग्रस्त भागाची केली पाहणी, पाहा VIDEO

पुराचा आढावा घेण्यासाठी गेलेले अन्वर एका गावकऱ्याच्या खांद्यावर बसून पूरग्रस्त भागातून जाताना दिसले, ज्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Katihar Tariq Anwar Viral Video: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकांचे घमासान सुरु असतानाच काँग्रेस पक्ष मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येत आहे. सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला एका नव्या वादाने घेरले आहे. कटीहारचे खासदार तारिक अन्वर यांच्या एका व्हिडिओवरून हा वाद निर्माण झाला असून, विरोधी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुराचा आढावा घेण्यासाठी गेलेले अन्वर एका गावकऱ्याच्या खांद्यावर बसून पूरग्रस्त भागातून जाताना दिसले, ज्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कटिहारचे खासदार तारिक अन्वर दोन दिवसांच्या मतदारसंघ दौऱ्यावर होते. या दरम्यान, ते पूरग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांनी सुरुवातीला ट्रॅक्टरवर बसून अनेक दुर्गम भागांना भेट दिली. परंतु, जेव्हा रस्त्यावर चिखल आणि पाणी साचले होते, तेव्हा त्यांनी एका गावकऱ्याच्या खांद्यावर बसून तो रस्ता पार केला. एका गावकऱ्याच्या खांद्यावर बसलेले ते, तर इतर दोन जण त्यांना तोल सांभाळण्यास मदत करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

महायुतीत वाद पेटणार! कलानी गटाची शिवसेना शिंदे गटाबरोबर युती, भाजपवर गंभीर आरोप

या घटनेनंतर काँग्रेस खासदार तारिक अन्वर यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, 'चिखल आणि पाणी पाहून गावकऱ्यांनीच मला खांद्यावर बसून रस्ता ओलांडण्याची विनंती केली होती आणि मी त्यांची ही विनंती नाकारू शकलो नाही.' दुसरीकडे, कटिहार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनील यादव यांनी वेगळेच कारण दिले आहे. त्यांनी म्हटले की, 'खासदार तारिक अन्वर काही आजारांमुळे पूरग्रस्त भागात नीट चालू शकत नव्हते, त्यामुळे लोकांनीच त्यांना खांद्यावर घेतले.'

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी या व्हिडिओवरून काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. जनतेच्या खांद्यावर बसलेला नेता कसा जनतेच्या समस्या सोडवू शकतो, असा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्ष काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Mamata banerjee: ठाकरेंच्या पावलावर ममता बॅनर्जींचे पाऊल! बंगालमध्ये घेतला मोठा निर्णय