Crime News: प्रेम, धोका, हत्येचा कट.. एका मफलरमुळे प्रियकर वाचला, दुसऱ्याचाच जीव गेला! भयंकर मर्डर केस

सृष्टीचे लग्न ठरताच तिचा प्रियकर प्रेम पासी लग्नात अडथळा आणत होता. तो सृष्टीसोबतच्या प्रेमप्रकरणाचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bihar Crime:  प्रेम, विश्वासघात, हत्येचा भयंकर कट आणि निष्पापाचा मृत्यू... बिहारच्या कैमुर पोलिसांनी एक खळबळजनक घटना उघडकीस आणली आहे, ज्याने सर्वांनाच चकित केले आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या हत्येचा कट रचला होता. मात्र मफलरमुळे मारेकऱ्यांचे टार्गेट चुकले अन् एका निष्पाप तरुणाचा जीव गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

प्रेम, विश्वासघात, हत्येचा कट..

पोलिस अधीक्षक (एसपी) हरिमोहन शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानपूर पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या सृष्टी कुमारी नावाच्या तरुणीचे तिच्या घरासमोर राहणाऱ्या प्रेम पासीशी प्रेमसंबंध होते. कुटुंबियांनी सृष्टीचे दुसरीकडे लग्न ठरवले होते. सृष्टीचे लग्न ठरताच तिचा प्रियकर प्रेम पासी लग्नात अडथळा आणत होता. तो सृष्टीसोबतच्या प्रेमप्रकरणाचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करत होता.

Pune News: पुणे हादरले! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह , धक्कादायक कारण समोर

या ब्लॅकमेलिंगला कंटाळून सृष्टीने प्रेम पासी याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी सृष्टीने तिचा सावत्र भाऊ सोहेल खानची मदत घेतली. दोघांनी मिळून प्रियकराला संपवण्याची सुपारीही दिली. २१ जानेवारीच्या संध्याकाळी, सोहेल खान आणि त्याचा साथीदार आशिष पांडे हे कट रचण्यासाठी भगवानपूर बाजारात मोटारसायकलवरून गेले. त्याठिकाणी एक अल्पवयीन मुलगा त्यांना सृष्टीच्या प्रियकराचे लोकेशन सांगत होता. 

मफलरमुळे झाला घोळ..

याचवेळी प्रेम पासी हा त्या परिसरात आला. त्याने  मुन्ना मिस्त्रींच्या दुकानाबाहेर त्याची बाईक पार्क केली आणि आत गेला. सोहेल खान आणि त्याच्या साथीदारांनी सृष्टीच्या प्रियकराची गाडी ओळखली. मात्र त्यावेळी सुशील चौरसिया हा दुसराच तरुण गाडीच्या शेजारी उभा होता. कडाक्याची थंडी असल्याने त्याने आपला चेहरा मफलरने गुंडाळला होता. इथेच मारेकऱ्यांची मोठी फसवणूक झाली.

Advertisement

(नक्की वाचा: Vasai News: वसई हादरली! पाण्याच्या टाकीतील मानवी हाडांमागील गूढ काय? हत्या की अघोरी कृत्य?)

बाईकशेजारी उभा असलेला तरुण हा प्रेम पासीच असल्याचे समजून त्यांनी सुशील चौरसियाच्या दिशेने गोळीबार केला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण कहाणी उघड झाली. पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत कट रचणाऱ्याची मैत्रीण सृष्टी कुमारीसह चार जणांना अटक केली.

Topics mentioned in this article