11 कोटींचा एक सल्ला, 150 कोटींची कर देणगी; प्रशांत किशोर यांची 3 वर्षांतील कमाई पाहून हैराण व्हाल!

प्रशांत किशोर म्हणाले, पैसे सरस्वतीमुळे येतो. रणनीतीकार म्हणून मी जो सल्ला देत होतो, त्याची फी घेत होतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

Prashant Kishor earned in 3 years : निवडणूक रणनीतीकार क्षेत्रात मोठी कामगिरी केल्यानंतर राजकीय मार्गावर चालणारे जन सुराजचे सूत्रधार प्रशांत किशोर यांनी फंडिंग आणि खासगी उत्पन्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. सोमवारी पाटन्यात पत्रकारांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी आपल्या उत्पन्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. 

तीन वर्षात 241 कोटींची कमाई 

प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं की, त्यांना ही रक्कम निवडणूक रणनीतीकाराच्या कामातून मिळवली आहे. ते राजकीय पक्षांना निवडणुकीबाबत सल्ला देण्याचं काम करीत होते. गेल्या तीन वर्षात, म्हणजे 2021-22 आर्थिक वर्षापासून आतापर्यंत त्यांच्या खात्यात फीच्या स्वरुपात एकूण 241 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

आपल्या व्यवसायाबाबत बोलताना त्यांनी दावा केला आहे की, ते एक सल्ल्यासाठी 11 कोटी रुपये घेत होते. उदाहरणादाखल त्यांनी सांगितलं की, नवयुगा कंन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला त्यांना सल्ला दिला. यावेळी केवळ दोन तासासाठी त्यांनी 11 कोटी रुपये फी घेतली. 

नक्की वाचा - बिहारमधील लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! महिलांच्या खात्यात येणार तब्बल एवढी रक्कम 

कर आणि देणग्यांची संपूर्ण माहिती

प्रशांत किशोर यांनी त्यांचे उत्पन्न सांगितले आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ते कर भरतात असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की, या 241 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर त्यांनी....

Advertisement

- 30 कोटी जीएसटीच्या रुपात जमा केले (जे एकूण उत्पन्नाच्या 18 टक्के आहे)
- 20 कोटींचा आयकर भरला (Income Tax) 

याव्यतिरिक्त प्रशांत किशोर म्हणाले, त्यांनी आपल्या खासगी पैशातून ९८ कोटींचं दान केलं आहे. ज्याचा वापर जन सुराजच्या कामामध्ये केला जात आहे. प्रशांत किशोर स्पष्टीकरण देताना म्हणाले, जे लोक वारंवार माझ्या कमाईबाबत सवाल उपस्थित करतात त्यांना हे प्रत्युत्तर आहे. ते पुढे म्हणाले, त्यांचा उद्देश बिहारमधून पैसे कमावणं नाही. तर राज्याच्या सुधारणेसाठी काम करणं आहे. ज्यासाठी ते स्वत:चे सर्व पैसे खर्च करतील.