Dog Babu : कुत्रेही बिहारचे रहिवासी झाले ? 'डॉग बाबू'ला मिळाले डोमिसाईल सर्टिफिकेट

Domicile Certificate To Dog: या डोमिसाईल सर्टिफिकेटवर अर्जदाराचे नाव 'डॉग बाबू', वडिलांचे नाव 'कुत्ता बाबू', आईचे नाव 'कुतिया देवी' असे लिहिण्यात आले होते. या कुत्र्याचा पत्ता म्हणून 'काऊलीचक वॉर्ड 15, मसौढी' असे डोमिसाईल सर्टिफिकेटवर लिहिण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
पाटणा:

पाटणा जिल्ह्यातील मसौढी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  इथल्या एका कुत्र्याला रहिवासी प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. या कुत्र्याच्या डोमिसाईल सर्टिफिकेटचा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कुत्र्याचे डोमिसाईल सर्टिफिकेटहा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील प्रसासनाच्या कारभारावर भलेमोठ्ठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

पाटण्यात नेमकं काय झालं ?

निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण अभियानादरम्यान डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी बरेच अर्ज करण्यात आले आहेत.  शासनानेही मोठ्या संख्येने डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अर्ज येत असल्याची माहिती दिली होती. सीमांचल जिल्ह्यातील प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यापूर्वी विशेष चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, पाटणा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला असून इथे एका कुत्र्याला डोमिसाईल सर्टिफिकेट देण्यात आले आहे.  

( नक्की वाचा: प्राजक्ता माळीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्याने जीव घातला धोक्यात )

कुत्र्याने पत्ताही दिला

मसौढी तहसील कार्यालयातून आरटीपीएस काउंटरद्वारे हे डोमिसाईल सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीचे ओळखपत्र असते त्या व्यक्तीचा फोटोही डोमिसाईल सर्टिफिकेटवर असतो. 'डॉग बाबू' ला दिलेल्या प्रमाणपत्रात कर्मचाऱ्यांनी अजिबात कुचराई न दाखवता, कुत्र्याचा फोटो नीटपणे या सर्टिफिकेटवर लावला आहे. सोबतच या कुत्र्याचे नाव आणि पत्ताही नमूद करण्यात आला आहे. आरटीपीएस काउंटरने 24 जुलै रोजी हे डोमिसाईल सर्टिफिकेट जारी केले आहे,  BRCOO 2025/15933581 या क्रमांकाने हे सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. यावर महसूल अधिकारी मुरारी चौहान यांची डिजिटल स्वाक्षरीही आहे.

( नक्की वाचा: जन्मतःच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, अवघ्या 21 आठवड्यांत झाला बाळाचा जन्म )

डॉग बाबूच्या वडिलांचे नाव कुत्ता बाबू

या डोमिसाईल सर्टिफिकेटवर अर्जदाराचे नाव 'डॉग बाबू', वडिलांचे नाव 'कुत्ता बाबू', आईचे नाव 'कुतिया देवी' असे लिहिण्यात आले होते. या कुत्र्याचा पत्ता म्हणून 'काऊलीचक वॉर्ड 15, मसौढी' असे डोमिसाईल सर्टिफिकेटवर लिहिण्यात आले होते.  अर्जदाराच्या फोटोच्या जागी कुत्र्याचा फोटो लावण्यात आला आहे. हे डोमिसाईल सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकारी हादरले आहेत त्यांची झोप उडाली असून हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हे डोमिसाईल सर्टिफिकेट रद्द करण्यात आले. त्यासोबतच महसूल अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरीही हटवण्यात आली आहे.

Advertisement

मसौढीचे अंचलाधिकारी प्रभात रंजन यांनी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉग बाबूला जारी केलेल्या डोमिसाईल सर्टिफिकेट प्रकरणाची पाटण्याचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम यांनीही दखल घेतली आहे.  त्यांनी सदर प्रकरणात जे अधिकारी, कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. 

Topics mentioned in this article