जाहिरात

Prajkta Mali Viral Video: प्राजक्ता माळीच्या एका कृतीने जिंकलं मन, पण नेटकऱ्यांचा संताप, पाहा नेमकं काय घडलं?

Prajkta Mali Viral Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहत्यासोबत व्हिडीओ व्हायरल होतोय, नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

Prajkta Mali Viral Video: प्राजक्ता माळीच्या एका कृतीने जिंकलं मन, पण नेटकऱ्यांचा संताप, पाहा नेमकं काय घडलं?
Prajkta Mali Viral Video: प्राजक्ता माळीचा व्हिडीओ व्हायरल

Prajkta Mali Viral Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कलाक्षेत्रातील प्रवास थक्क करणारा आहे. मालिका, कार्यक्रम आणि सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचे स्थान निर्माण केलंय. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरात पोहोचली. यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमुळे तिचे आणि प्रेक्षकांचे मजबूत नाते निर्माण झाले. 'फुलवंती' सिनेमाच्या माध्यमातून प्राजक्ताने सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले. तिचा हा प्रवास चाहत्यांनी जवळून पाहिलाय. प्राजक्ता माळीच्या चाहत्यांची संख्याही भलीमोठी आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ताचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने प्राजक्ताच्या चाहत्यांचे मन जिंकलंय. पण दुसरीकडे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नेमके काय आहे व्हिडीओमध्ये जाणून घेऊया...

प्राजक्ता माळीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय आहे? (Prajkta Mali Viral Video)

अमोल भास्कर (Amol Bhaskar) नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर प्राजक्ता माळीचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याने प्राजक्ता माळीचा फॅन मोमेंट टिपलीय. प्राजक्ता माळीला पाहताच एक चाहता तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी बरीच धडपड करत असल्याचे दिसतंय. चाहता सेल्फीसाठी प्रयत्न करत होता, त्यावेळेस प्राजक्ता लिफ्टच्या आतमध्ये होती. चाहत्याला इजा पोहोचू नये म्हणून लिफ्टच्या दारांमध्ये तिने पाय देखील ठेवला. शिवाय लिफ्ट बंद होऊ नये म्हणून बटणही दाबले. चाहत्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्राजक्ताने शक्य तितकी सर्व काळजी घेतली. पण चाहता प्राजक्तासोबत सेल्फी काढण्यासाठी ज्या पद्धतीने वागत होतो, ते नेटकऱ्यांना आवडले नाही.  

(नक्की वाचा: Nivedita Saraf News: निवेदिता सराफ-गिरीश ओक पुन्हा एकत्र! मालिका, सिनेमा की नाटक? काय आहे नवा प्रोजेक्ट)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Prajakta Mali Instagram

प्राजक्ताचा हा चाहता दिव्यांग होता. सेल्फीसाठी तो लिफ्टच्या दरवाज्यांच्या मधोमध उभा राहिला, केवळ एका सेल्फीसाठी त्याने अशा पद्धतीने धोका पत्करणे आणि एकूणच त्याच्या कृतीवर नेटकऱ्यांनी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये संताप व्यक्त केलाय. पण प्राजक्ता माळीने संयमाने ही परिस्थिती हाताळली. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Prajakta Mali Instagram

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com