Love Story: 12वीच्या विद्यार्थिनीने केले शिक्षकाशी लग्न; Video शेअर करत पोलिसांकडे केली मोठी मागणी

Teacher-Student Marriage : कोचिंगमध्ये शिकत असताना एका विद्यार्थिनीचं प्रेम तिच्या शिक्षकावर जडलं. ही गोष्ट इतकी पुढे गेली की दोघांनी लग्नच केले.

जाहिरात
Read Time: 3 mins
Teacher-Student Marriage : कोचिंगमध्ये दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले.
मुंबई:

Teacher-Student Marriage : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. या नात्यांनाही काही वेळा वेगळं वळण लागतं. त्यामुळे त्याला विरोध मोठ्या प्रमाणात होतो. बिहारमधील जमुई (Jumai) जिल्ह्यातील एका शिक्षक-विद्यार्थिनीच्या प्रेमसंबंधाची (Teacher-Student Love Affair) खूप चर्चा आहे. कोचिंगमध्ये शिकत असताना एका विद्यार्थिनीचं प्रेम तिच्या शिक्षकावर जडलं. ही गोष्ट इतकी पुढे गेली की दोघांनी लग्न (Marriage)च केले. लग्नानंतर दोघांनाही घरच्यांची भीती वाटू लागल्याने, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून पोलिसांकडे (Jumai Police) मदत मागितली आहे. 

काय आहे प्रकरण?

हे सर्व प्रकरण बिहारमधील जमुईच्या छठू धनामा पंचायतीमधील आहे इंटरची परीक्षा देणाऱ्या सिंधु कुमारी (Sindhu Kumari) नावाच्या विद्यार्थिनीने तिचा शिक्षक प्रभाकर महतो (Prabhakar Mahato) याच्याशी विवाह केला आहे.

शिक्षक प्रभाकर महतो हे लखीसराय जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त 6 महिन्यांपूर्वीच बिहार पोलीसमध्ये भरती झाले आहेत. तर, सिंधु जमुई शहराची रहिवासी असून इंटरच्या अभ्यासासोबतच ती सरकारी नोकरीची तयारीही करत होती. याच दरम्यान, कोचिंगमध्ये दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

( नक्की वाचा : Navratri special : अविश्वसनीय! नवरात्रीत भूतांचा मेळावा; या मंदिराला म्हणतात भूत-पिशाच्चांचे सर्वोच्च न्यायालय )
 

पळून जाऊन लग्न

सिंधुच्या कुटुंबाला या संबंधाची माहिती मिळताच प्रकरण बिघडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते आणि ते तिचे लग्न दुसरीकडे निश्चित करत होते. जेव्हा दोघांना वाटले की आता घरचे मान्य करणार नाहीत, तेव्हा त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मागील शुक्रवारी दोघे घरातून बाहेर पडले आणि एका मंदिरात जाऊन त्यांनी गुपचूप विवाह केला.

Advertisement

मुलगी व्हिडिओमध्ये काय म्हणाली?

लग्नानंतर, प्रभाकर किंवा त्यांच्या कुटुंबाला घरचे त्रास देतील अशी भीती दोघांना वाटू लागली. त्यामुळे सोमवारी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. व्हिडिओमध्ये सिंधु कुमारीने स्पष्टपणे सांगितले की, ती 18 वर्षांवरील (सज्ञान) आहे आणि तिने आपल्या मर्जीने प्रभाकरशी लग्न केले आहे. तिने सांगितले की, प्रभाकरने तिला पळवून नेलेले नाही. सिंधूने पोलीस आणि समाजाला हात जोडून विनंती केली आहे की, विनाकारण तिचा पती प्रभाकर आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला जाऊ नये.

( नक्की वाचा : Strange Wedding: दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच मुलीशी लग्न, कारण वाचून डोक्याला माराल हात! )
 

शिक्षक प्रभाकरनेही व्हिडिओमध्ये सांगितले की, त्यांचे सिंधुवर खरे प्रेम आहे आणि ते आयुष्यभर सोबत राहतील. त्यांनीही स्वतःच्या आणि पत्नीच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे विनवणी केली आहे.

Advertisement

हा व्हिडिओ व्हायरल होताच जमुई टाऊन पोलीस स्टेशनमधील पोलीस कामाला लागले आहेत. ठाणे प्रमुख अमरेंद्र कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण गंभीर असून त्याची पूर्णपणे चौकशी केली जात आहे. पोलीस दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांशी आणि या जोडप्याशी बोलतील, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही दबाव तर नाही ना हे तपासता येईल. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणाची कायदेशीर बाजू स्पष्ट होईल.