
Supreme Court of Ghosts : देशभरातील अनेक मंदिराबाबत वेगवेगळ्या अख्यायिका सांगितल्या जातात. काही मंदिरातील देवता नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा असते. तर काही मंदिरं प्राचीन असल्यानं त्याचं मोठं महत्त्व असतं. सध्या सुरु असलेल्या नवरात्रीमध्येही देशभरात वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराची माहिती सांगणार आहोत या मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये भूतांचा मेळावा भरतो, असे मानले जाते. . इतकेच नाही तर या मंदिराला भूत-पिशाच्चांचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) देखील म्हटले जाते. . कितीही बिघडलेले भूत-पिशाच्च असले तरी बाबांच्या दरबारात ते शांत होते, अशी येथील श्रद्धा आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून आपली समस्या दूर करण्यासाठी भाविक येथे येतात.
काय आहे मंदिराची कहाणी?
बिहारमधील कैमूर जिल्ह्यातल्या चैनपूरमध्ये हरसू ब्रह्म स्थान आहे. या मंदिराबाबत भाविकांची ही श्रद्धा आहे. हरसू ब्रह्म धामाची कहाणी खूप वर्षांपूर्वीची आहे. हरसू बाबा हे जातीने ब्राह्मण होते आणि ते राजा शालिवाहन यांचे राज पुरोहित होते. राजाला संतान नव्हते. म्हणून हरसूजींनी राजाला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने दुसरे लग्न केले, तेव्हा पहिली राणी नाराज झाली आणि तिने राजाला सांगून हरसू बाबांचा महाल पाडून टाकला.
या घटनेमुळे हरसू बाबा संतप्त झाले आणि त्यांनी राजा आणि त्याच्या राज्याचा विनाश केला. इतकंच नाही स्वतःही देह त्याग केला. अशा परिस्थितीत, हरसू बाबांविषयी लोकांची श्रद्धा खूप वाढली आणि त्यांनी देह त्यागलेल्या जागी लोकांनी ब्रह्म स्थान बनवले आणि पूजा-अर्चा सुरू केली.
( नक्की वाचा : Menstruation Cyle: मासिक पाळी सुरू झाली की केळीच्या झाडाशी लग्न! देशात 'इथं' आजही पाळली जाते अजब परंपरा )
काय आहे भाविकांची श्रद्धा?
हळूहळू लोकांची श्रद्धा आणखी वाढत गेली आणि ती दूरदूरपर्यंत पसरली. आता विज्ञानाच्या युगातही लोक अंधश्रद्धेचं पालन करतात .कारण भाविकांमध्ये अशी मान्यता आहे की, येथे आल्याने मोठे मोठे रोग आणि भूत-प्रेत बाबा बरे करतात.
दरम्यान, सरकार अंधश्रद्धेविरुद्ध सतत मोहीम राबवत आहे. पण तरीही लोक अंधश्रद्धेत जगत आहेत आणि डॉक्टरांकडे जाण्याऐवजी ओझा-गुनी (मांत्रिकांकडे) जातात. संपूर्ण नवरात्रभर अंधश्रद्धा असलेल्या लोकांची गर्दी इथं जमते. त्यामुळे हे मंदिर हे भाविकांसाठी खास आकर्षणाचं केंद्र बनलं आहे.
स्पष्टीकरण : ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV नेटवर्क कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचा प्रसार करत नाही. त्यावर विश्वासही ठेवत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world