ACB Raid: सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी धाड, घरात सापडलं घबाड! 76 लाखांची रोकड, 1 किलो सोने, अन् बरच काही

त्याची ही मालमत्ता पाहीली तर हा खरोखर एक सरकारी कनिष्ठ सहाय्यक आहे का असा प्रश्न पडल्या शिवाय राहाणार नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बीकानेरमधील पंचायती राज विभागातील कनिष्ठ सहायक शुभकरण परिहारवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा संशय होता
  • एसीबीने शुभकरणच्या 5 ठिकाणी धाड टाकून ७६ लाख रुपयांची रोकड, १ किलो सोने आणि २ किलो चांदी जप्त केली
  • शुभकरणच्या मालमत्तेचा तपास केला असता त्याच्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत ९३८ टक्के जास्त संपत्ती आढळली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करून किती कामाई करून शकतो याचा अंदाजच येतो. राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. बीकानेरमधील पंचायती राज विभागातील कनिष्ठ सहायक (LDC) शुभकरण परिहार याच्या 5 ठिकाणांवर शुक्रवारी सकाळी एसीबीच्या 5 पथकांनी धाड टाकली. या घाडीत परिहारच्या घरून नोटांची बंडल, किलोभर सोने-चांदी आणि आलिशान बंगल्यांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या मालमत्तेचा आकडा पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत.

एसीबीचे महासंचालक गोविंद गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभकरण याच्याकडे त्याच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा तब्बल 938 टक्के जास्त संपत्ती आढळली आहे. बीकानेर आणि फलोदी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 75.80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या शिवाय 1 किलोपेक्षा जास्त सोने ताब्यात घेण्यात आले आहे. सोन्या सोबतच तब्बल 2 किलो चांदी ही जप्त करण्यात आली आहे. एका सामान्य लिपिकाने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हे कोट्यवधींचे साम्राज्य उभे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा - Valentines Day: शिवसेनेची व्हॅलेनटाईन डे ची खास तयारी!, बघाल तर हैराण व्हाल, Video Viral

काय काय मिळाले?

  • रोकड: 76 लाख रुपये (अंदाजे)
  • दागिने: 1 किलो सोने, 2 किलो चांदी
  • स्थावर मालमत्ता: बीकानेर आणि पुनरासरमध्ये 4 आलिशान बंगले
  • जमीन: 17 हेक्टर (100 बिघा पेक्षा जास्त) शेतजमीन

कनिष्ठ सहायकाचा पगार किती असावा? असा आपल्याला प्रश्न असेल.  पण राजस्थानच्या बीकानेरमध्ये एका 'बाबू'ने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शुभकरण परिहार याच्या घरावर जेव्हा एसीबीने धाड टाकली, तेव्हा 500 च्या नोटांची बंडले आणि सोन्याची बिस्किटे पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. शुभकरणने भ्रष्टाचाराच्या पैशातून स्वतःचे आलिशान आयुष्य आणि कोट्यवधींची मालमत्ता तयार केली होती. त्याची ही मालमत्ता पाहीली तर हा खरोखर एक सरकारी कनिष्ठ सहाय्यक आहे का असा प्रश्न पडल्या शिवाय राहाणार नाही. पण तो सर्वा ही माया खुलेआम पद्धतीने मिळवत होता हे आता स्पष्ट झाले आहे. 

नक्की वाचा - Viral Video: व्हिडीओत दिसणारी ही खासदार कोण आहे ? दोघांमध्ये नेमकी काय बातचीत झाली ?

एसीबीच्या पथकाने बीकानेरमधील मातेश्वरी एन्कलेव, गंगाशहर आणि इतर तीन ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. तपासात असे दिसून आले की, आरोपीकडे 17 हेक्टरची महागडी शेतजमीन आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी 3 बंगले आहेत. ही सर्व मालमत्ता काळ्या पैशातून घेतल्याचा संशय असून, एसीबीचे पथक अजूनही कागदपत्रांची तपासणी करत आहे. सायंकाळपर्यंत आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. एसीबीच्या तपासात शुभकरणची संपत्ती त्याच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा 938 टक्क्यांनी अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. बीकानेर शहर आणि पुनरासर गावात त्याचे आलिशान निवासस्थान आहे. सामान्य नोकरीत असतानाही एवढी अफाट माया जमवल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दोषीवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया विभागाने सुरू केली आहे.

Advertisement