जाहिरात

Blast News: कोळसा खाणीत भीषण स्फोट! 16 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

जिल्हा पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Blast News: कोळसा खाणीत भीषण स्फोट! 16 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
  • मेघालयच्या पूर्व जयंतिया हिल्समधील बेकायदा कोळसा खाणीत स्फोट
  • या स्फोटामुळे 16 कामगारांचा मृत्यू, अद्याप काही जण खाणीत अडकले
  • राष्ट्रीय हरित लवादाने २०१४ मध्ये रॅट-होल खाणकामावर बंदी घातली असतानाही छुप्या पद्धतीने काम सुरू
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Meghalaya Coal Mine Blast: ईशान्येकडील मेघालय राज्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यात एका बेकायदा कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 16 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक कामगार अद्याप खाणीत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस महासंचालक (DGP) आय. नोंगरंग यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेनं मेघालयमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना थांगस्कू परिसरात घडली आहे. स्फोट झाला तेव्हा खाणीत नेमके किती कामगार होते, याची अचूक माहिती अद्याप उपलब्ध नाही. पोलिसांनी आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढले आहेत. प्राथमिक तपासानुसार, कोळसा काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला असावा. विशेष म्हणजे, राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 2014 मध्येच मेघालयातील 'रॅट-होल' खाणकामावर बंदी घातली आहे. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने हे काम सुरू असल्याचे या दुर्घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना शिलाँग येथे हलवण्यात आले आहे. ही खाण बेकायदा असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक विकास कुमार यांच्या मते, ही खाण पूर्णपणे बेकायदेशीर होती. कोळसा उत्खननादरम्यान हा स्फोट झाला. एनजीटीच्या नियमांना हरताळ फासून हे काम सुरू होते. पोलीस सध्या स्फोटाच्या कारणांचा तपास करत असून मदत कार्य सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com