न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, एका हातामध्ये तलवारीच्या जागी संविधान

भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदललाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायदेवतेच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदललाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायदेवतेच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली आहे. त्यामुळे एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान असं नवं रुप न्यायदेवतेला देण्यात आलं आहे. 

ब्रिटीशांच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेतील बहुतांश कायदे रोमन संस्कृतीतील प्रतीकांच्या आधारे तयार करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू आणि तलवार असणारी रोमन पोशाखातील न्याय देवता 'लेडी जस्टिशिया'ची मूर्ती भारताची न्यायादेवता म्हणून स्विकारण्यात आली. आज सरन्यायधीश धनजंय चंद्रचूड यांनी या न्यायदेवतेचा चेहरा मोहोराच पालटून टाकलाय. नवी न्यायदेवता भारतीय पोषखात आहे. तिच्या गळ्यामध्ये भारतीय दागिने आहेत. तिची केशभूषा देखील भारतीय करण्यात आली आहे. शिवाय न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून टाकण्यात आली आहे. या निर्णयातून 'अंधा कानून' नाही, हा संदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसा झाला बदल?

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी याबाबतचे निर्देश दिले आहे. नव्या रुपातील पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ग्रंथालयात उभारण्यात आला आहे. यापूर्वी न्यायदेवतेचे दोन्ही डोळ्यांवर पट्टी होती. तसंच एका हातामध्ये तराजू आणि दुसऱ्या हातामध्ये शिक्षा देण्याचं प्रतीक म्हणून तलवार होती. 

का घेतला निर्णय?

CJI कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण इंग्रजांच्या वारश्यातून पुढं गेलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांचं मत आहे. ते सर्वांना समान लेखतात. त्यामुळे न्यायदेवतेचे स्वरुप बदलण्यात यावं. देवीच्या हातामध्ये तलवार नाही तर संविधान हवं. त्यामुळे समाजात संविधानाच्या हवाल्यानं न्याय दिला देण्यात येतो हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल. 

( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )

न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हे हिंसेचं प्रतीक होतं. कोर्ट हे हिंसा नाही तर राज्य घटनेच्या आधारावर न्याय होतो. त्यामुळे दुसऱ्या हातामध्ये तराजू योग्य आहे. जो सर्वांना समान न्याय देतो, असं मुख्य न्यायाधीशांचं मत आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CJI चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार न्यायदेवतेची मूर्ती नव्यानं बनवण्यात आली आहे. सर्वात पहिल्यांदा न्यायाधीशांच्या ग्रंथालयात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत. त्याचबरोबर डाव्या हातात तलवारीच्या जागी संविधान आहे. तर उजव्या हातात पहिल्यासारखाच तराजू आहे. 

न्यायदेवतेच्या मूर्तीचा उगम कुठं

न्यायदेवता ही वास्तविक यूनानमधील प्राचीन देवी आहे. तिला न्यायाचं प्रतीक मानलं जातं. तिचं नाव जस्टिशिया आहे. त्याच नावापासून जस्टीस हा शब्द तयार झाला. या देवीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्याचा देखील खास अर्थ होता. न्यायदेवता नेहमी निष्पक्ष न्याय करेल हा त्याचा अर्थ होतो. कुणाला पाहिल्यानंतर न्याय एका पक्षाकडं झुकू शकतो. त्यामुळे या देवतेनं डोळ्यांना पट्टी बांधली आहे. 

इंग्रजांनी भारतात आणली मूर्ती

यूनानमधून ही मूर्ती ब्रिटीशमध्ये दाखल झाली. 17 व्या शतकात एक इंग्रज अधिकारी ही मूर्ती भारतामध्ये घेऊन आला. तो अधिकारी न्यायालयात अधिकारी होता. ब्रिटीशांच्या कार्यकाळात 18 व्या शतकाच्या दरम्यान न्यायदेवीच्या मूर्तीचा पहिल्यांदा सार्वजनिकपणे वापर करण्यात आला. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण याच न्यायदेवतेचे स्वीकार केला.