जाहिरात

Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम

Voter ID : या पद्धतीचा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मतदार ओळखपत्र डाऊनलोड (How To Download Voter ID) करु शकता. 

Voter ID डाऊनलोड कसा करणार?  वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम
Download Voter ID Card Online 2024 : तुम्ही घरात बसून निवडणूक ओळखपत्र डाऊनलोड करु शकता.
मुंबई:

Voter ID card Online: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी ओळखपत्र (Voter ID Card) देण्यात येतं. तुमचं हे ओळखपत्र हरवलं असेल तर ते कसं डाऊनलोड करावं याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

मतदान ओळखपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं डाऊनलोड  (Voter ID Card Online Download)  करु शकता. त्यासाठी तुम्हाला सायबर कॅफेत किंवा अन्य कुठंही जाण्याची गरज नाही. अगदी काही मिनिटांमध्येच तुम्ही हे ओळखपत्र डाऊनलोड करु शकता. फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. या फोनमध्येच तुम्ही मतदान ओळखपत्राची डिजिटल कॉपी म्हणजेच e-EPIC डाऊनलोड (E-Epic Download) करुन तुम्ही फोनमध्ये तो सेव्ह करु शकता. 

निवडणूक आयोगाकडून डिजिटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सूविधा (How To Download Voter ID) खूप पूर्वीपासून सुरु केलीय. पण, अनेकांना हे ओळखपत्र डाऊनलोड करण्याची पद्धत माहिती नाही. त्यामुळे त्यांना या सूविधेचा लाभ घेता येत नाही. वास्तविक ही पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही घरात बसून मतदार ओळखपत्र (Online Voter Card Download) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकता. 


ऑनलाईन Voter ID डाऊनलोड कसं करावं?

या पद्धतीचा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मतदार ओळखपत्र डाऊनलोड (How To Download Voter ID) करु शकता. 

  • सर्वात प्रथम राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट  WWW.ECI.GOV.IN वर जा
  • त्यावरील मेन्यू सेक्शनवर क्लिक करा
  • त्यानंतर डाऊनलोड e-Epic निवडा
  • तुमच्या पेजवर नवे पेज उघडेल त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील
  • त्याच स्क्रिनवर खाली स्क्रोल करुन सर्व्हिस सेक्शनमध्ये जा
  • त्याखाली e-Epic डाऊनलोडवर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ईमेल किंवा EPIC नंबर आणि कॅप्चा कोर्ड भरल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावं लागेल.
  • रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी येईल तो टाकल्यानंतर व्हेरिफाय आणि लॉग इन करा
  • लॉगइन केल्यानंतर तुम्हाला EPIC नंबर आणि राज्य निवडा. तसंच सर्चवर क्लिक करा
  • आता नवे पेज उघडेल त्यावरील डाऊनलोड EPIC वर क्लिक करा
  • तुमच्या फोनमध्ये मतदान ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाऊनलोड झाली असेल


भारतीय नागरिक या नात्यानं तुम्हाला मतदान करण्याचा घटनात्मक हक्क आहे. 18 वर्ष पूर्ण केलेले सर्व भारतीय नागरिक मतदान करण्यासाठी पात्र आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची ही संधी सोडू नका. त्यासाठी वर दिलेल्या पद्धतीनं तातडीनं मतदार ओळखपत्र (Voter Card Apply online 2024) डाऊनलोड करा. 

Voter ID नसेल तरी टेन्शन नाही, तुम्हाला करता येईल मतदान!
 

Previous Article
Exit Polls : Nonsense...एक्झिट पोलवर भडकले निवडणूक आयुक्त, जाहीरपणे दिला सल्ला
Voter ID डाऊनलोड कसा करणार?  वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम
sanjay-kaka-patil-vs-rohit-patil-conflict-escalates-tasgaon-kavthemahankal-sangli
Next Article
आबा-काका गटात पुन्हा संघर्ष ! रोहित पाटील आईसह पोलीस ठाण्यात, पुढे काय झालं?