Ambulance in 10 minutes : अवघ्या 10 मिनिटात रुग्णवाहिका तुमच्या दारी, Blinkit ने सुरू केली नवी आपत्कालीन सेवा

10 मिनिटात केवळ वस्तूचं नाही तर रुग्णवाहिकाही तुमच्या दारात पोहोचू शकते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

10 मिनिटात केवळ वस्तूचं नाही तर रुग्णवाहिकाही तुमच्या दारात पोहोचू शकते. क्विक कॉमर्स कंपनी Blinkit ने आपल्या नव्या आपत्कालीन सेवा सुरू केली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या उपकंपनीने आता दररोजच्या सामानांसह आपत्कालीन रुग्णवाहिकेची सुविधा देत एक मोठं पाऊल उचललं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या ही आपत्कालिन सेवा दिल्लीजवळील गुरूग्राममध्ये सुरू करण्यात आली आहे. लवकरच अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येईल. Blinkit चे प्रमुख अलबिंदर ढिंडसा यांनी अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याची घोषणा केली आहे. 

नक्की वाचा - 31 December Online Order : कंडोम, आलू भूजिया, बर्फ अन्...; 31 डिसेंबरच्या रात्री 'या' गोष्टींची सर्वाधिक ऑनलाइन ऑर्डर

Advertisement

अवघ्या 10 मिनिटात रुग्णवाहिका तुमच्या दारात...
Blinkit चे प्रमुख आणि संस्थापक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 10 मिनिटात रुग्णवाहिका शहरांमध्ये अधिक जलद गतीने पोहोचविण्यासाठी हे आमचं पहिलं पाऊल आहे. सुरुवातील पाच रुग्णवाहिका 2 जानेवारीपासून गुरूग्रामच्या रस्त्यांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतरच भागांमध्ये ही सुविधा वाढविण्यात येणार आहे. तुम्ही Blinkit च्या अॅपच्या माध्यमातून बेसिक लाइफ सपोर्टची रुग्णवाहिका बुक करू शकता. 

रुग्णवाहिकेत बेसिक लाइफ सपोर्ट उपलब्ध...
ब्लिंकिटच्या रुग्णवाहिकेत बेसिक लाइफ सपोर्टसाठी ऑक्सिजन सिलिंडर, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफ्रिब्रिलेटर, स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि आवश्यक आपत्कालीन औषधं आणि इंजेक्शन उपलब्ध असतील. 

Advertisement