लग्न मंडपात नवरा- नवरी, वरमाळा घालणार तेवढ्या बॉयफ्रेंड आला, अन् पुढे जे घडलं ते...

शुभमुहूर्तावर पुरोहितांनी लग्नाचे विधी सुरू केले होते. त्याच वेळी नवरीच्या प्रियकराचा तिला फोन आला.

जाहिरात
Read Time: 3 mins

लग्नासाठी नवरा नवरी सज्ज होते. मंडप सजला होता. दोन्ही कुटुंबातले सर्व लोक एकत्र आले होते. ब्राम्हण मंत्रौच्चार करत होते. मंगलाष्टके पडण्याची वेळी जवळ आली होती. काही क्षणातच नवरा नवरीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधणार होता. पण तेवढ्यातच एक फोन नवरी मुलीला आला. त्यानंतर तिने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं. आपल्याला हे लग्न करायचं नाही असं तिने स्पष्ट पणे सांगितलं. शिवाय आपलं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचं ही तिने सांगितलं. मुलगी लग्नाला तयार नसेल तर आपण लग्न करणार नाही असं नवऱ्या मुलाने ही सांगितलं. हे सर्व होत असताना मुलीचा बॉयफ्रेड लग्न मंडपात पोलिसांना घेलून पोहोचला. त्यानंतर नवरीचा हात पकडून तो लग्न मंडपातूनच तिला घेवून गेला. सर्व जण पाहातच राहीले. अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना कर्नाटक राज्यात घडली आहे. कर्नाटकातील हासन तालुक्यातील बूवनहळ्ळी गावातील पल्लवी आणि आलूर तालुक्यातील वेणुगोपाल यांचे लग्न ठरले होते. त्यानुसार हासन शहरातील श्री आदिचुंचनगिरी कल्याण मंडपात लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व कुटुंबीय नातेवाईक जमले होते. लग्नाची जय्यत तयारी झाली होती. सर्व काही तयार होते. आता फक्त नवरीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधण्याचे बाकी होते. त्याच वेळी एका फोनने गडबड केली आणि एकच खळबळ उडाली. नवऱ्या मुलीने सर्वांच्या समोर लग्नास नकार दिली. आपल्याला लग्न करायचं नाही असं तिने स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 7 दिवस 11 गावं 2 गाड्या, हगवणे बाप-लेकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून काय काय केले?

शुभमुहूर्तावर पुरोहितांनी लग्नाचे विधी सुरू केले होते. त्याच वेळी नवरीच्या प्रियकराचा तिला फोन आला. त्यानंतर मात्र तिचे मन वळले. तिने लग्नास नकार दिला. तिला त्यावेळी तिच्या आई वडीलांनी समजावण्याचा प्रयत्न केला. नवऱ्या मुलाने ही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तू लग्नास तयार आहेस का अशी विचारणा ही केली. पण ती सुरूवातीला काही सांगत नव्हती. शेवटी तिला घरचे ही ओरडले. नवऱ्या मुलाने ही खरे कारण काय आहे सांग असं म्हटलं. त्यावर तिने आपल्या दुसऱ्या मुला बरोबर प्रेम असल्याचे त्यावेळी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?

हे सर्व मंडपात नाट्य सुरू असताना खरं नाट्य अजून बाकी होतं. या सर्वांमुळे मंडपात एकच गोंधळ उडाला होता. त्याच वेळी नवरीचा बॉयफ्रेंड लग्न मंडपात आला. तो एकटा आला नाही तर तो पोलिसांना घेवून मंडपात आला. त्यानंतर त्याने थेट नवरीचा हात धरला आणि तिला घेवून मंडपा बाहेर निघून गेला. सर्व जण हे पाहातच राहीले. सर्वांच्या डोळ्या समोर तिचा बॉयफ्रेंड तिला घेवून गेला. मुलीच्या या अशा वागण्याने मंडपातच मुलीच्या आई वडीलांना आश्रू अनावर झाले. 

Advertisement