जाहिरात

Terrorist Killed: लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह खालिदची हत्या! भारतातील 'या 3 हल्ल्यांचा मास्टरमाईंड अन्...

Terrorist Rajullah Nizamani: पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

Terrorist  Killed: लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह खालिदची हत्या! भारतातील 'या 3 हल्ल्यांचा मास्टरमाईंड अन्...

Terrorist Rajullah Nizamani Killed: ऑपरेशन सिंदूरमुळे आधीच घाबरलेल्या पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जमातचा दहशतवादी राजुल्ला निजामानी उर्फ ​​अबू सैफुल्ला पाकिस्तानच्या सिंधमध्ये ठार झाला. पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  रविवारी (ता.18 मे) मतली फाळकारा चौकात राजुल्ला निजामानी उर्फ ​​अबू सैफुल्लाहवर गोळ्या झाडण्यात आल्या. सैफुल्लाह नेपाळमधील लष्करच्या मॉड्यूलवर काम करत होता आणि भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी आणि आर्थिक मदत गोळा करणे यासारखे गंभीर गुन्हे करत होता. सैफुल्ला हा लष्करचा ऑपरेशनल कमांडर आझम चीमा उर्फ ​​बाबाजी याचा सहकारी होता.

सैफुल्ला खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता होता. लष्कर-ए-तैयबाने भारतात हल्ल्यांची तयारी करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, त्याने अनेक वर्षे नेपाळमध्ये तळ स्थापन केला आणि तेथून भारतात सतत दहशतवादी हल्ले करत होता. पण नंतर तो नेपाळमधून पळून गेला आणि पाकिस्तानात लपला, तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.

(नक्की वाचा-  पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देणार)

२००६ मध्ये नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सैफुल्लाहचा सहभाग होता. याशिवाय, रामपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यात आणि आयआयएससी बंगळुरूवर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा सहभाग होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com