भेसळयुक्त हळदीमुळे नवरीचा मृत्यू; हळद खरेदी करताना काय काळजी घ्याल? भेसळ ओळखण्याची घरगुती पद्धत!

हळदीच्या भेसळीतून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नाच्या घरात हळदीचा विधी सुरू होता. मात्र काही वेळानंतर नवरा-नवरीची प्रकृती अचानक बिघडली. ज्यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
NDTV

सद्यस्थितीत भेसळ ही एक मोठी समस्या बनली आहे. खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधील भेसळीच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अशाच प्रकारे हळदीच्या भेसळीतून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नाच्या घरात हळदीचा विधी सुरू होता. मात्र काही वेळानंतर नवरा-नवरीची प्रकृती अचानक बिघडली. ज्यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली. 

भेसळयुक्त हळदीचा वापर केल्याने नवरी आणि नवरदेव दोघांची प्रकृती बिघडली. त्यांच्या शरीरावर लाल रंगाचे चट्टे आले. शरीरभर सूज आली आणि श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. प्रकृती गंभीर झाल्याचं लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान नवरीचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे.

ही घटना पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आपणही भेसळयुक्त हळदीचा वापर तर करीत नाही ना, असा सवाल उपस्थित होतो. अशावेळी भेसळयुक्त हळद कशी ओळखायची हे ओळखणं आवश्यक आहे. यासाठी डॉ. समीर भाटी यांनी भेसळयुक्त हळद ओळखण्यासाठी काही घरगुती सोपे टेस्ट सांगितले आहेत. याच्या मदतीने तुम्ही भेसळयुक्त हळद ओळखू शकता. 

Advertisement

भेसळयुक्त हळद कशी ओळखाल? 

  • दोन ट्रान्सपरेंट ग्लास घ्या. 
  • आता दोन्ही ग्लासमध्ये थोडी थोडी हळदीची पावडर घाला. 
  • यानंतर दोन्ही ग्लासात समप्रमाणात पाणी घाला आणि काही मिनिटं लक्ष देऊन पाहा. 

जर हळद चांगल्या गुणवत्तेची असेल तर त्याचा रंग हळूहळू हलका होऊन ग्लासाच्या खाली बसेल आणि पाणी गडद पिवळ्या रंगाचा होत नाही. जर हळद भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग लगेचच गडद पिवळा किंवा नारंगी होता आणि बराच काळ असाच राहतो. हे दोन्ही ग्लास जवळजवळ ठेवून तुलना करू शकता. ज्या ग्लासामधील रंग अधिक गडद आणि वेगळा दिसेल त्यात भेसळ असण्याची अधिक शक्यता असते. 

या पद्धतीने तुम्ही घरबसल्या हळदीतील भेसळ तपासू शकता. पूर्णपणे खात्री करण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचणी हा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु प्राथमिक तपासणीसाठी हा घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो.
 

Topics mentioned in this article