CA Result 2025 : CA चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात पहिला आला आहे.द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे महिन्यात सनदी लेखापाल म्हणजेच सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा (Rajan Kabra) देशातून पहिला आला असून छत्रपती संभाजीनगरचे तब्बल सात विद्यार्थी रँकमध्ये आले आहे.
नक्की वाचा - Akola News : अकोल्याच्या शेतकरी पुत्राची मोठी भरारी, BCCI च्या पंच परीक्षेत भारतातून आला पहिला
कोण आहे राजन काबरा?
राजन काबरा आज चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या जगातील नवा स्टार ठरला आहे. अवघ्या 22 व्या वर्षी त्याने सीएच्या तिन्ही परीक्षा फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षा केवळ पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्याने CA फायनल 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवली आहे.
राजनचे वडीलही CA...
राजन हा स्वत:ला सीए कुटुंबातील आहे. त्याचे वडील स्वत: चार्टर्ड अकाऊंटंट आहे. आई गृहिणी तर बहीण डॉक्टर आहे. राजनने या काळात ICAI च्या स्टडी मटेरियलवर लक्ष केंद्रीत केलं. त्याने सांगितलं की, माझ्या यशाचं कोणतंही सिक्रेट नाही. मी केवळ ICAI च्या सामग्रीवर फोकस केला. कॉन्सप्ट क्लियर ठेवले आणि वारंवार सराव केला. विषय समजून घेण्यासाठी त्याने कोचिंग लावली होती.