- मध्य प्रदेश में तीन दिनों में कार्बाइड गन के कारण 122 से अधिक बच्चों को गंभीर आंखों की चोटें आई हैं
- भोपाल के हमीदिया अस्पताल में अकेले 26 से अधिक बच्चे इस खतरनाक जुगाड़ से घायल होकर भर्ती हुए हैं
- कार्बाइड गन माचिस की तीलियों और बारूद को प्लास्टिक या टीन के ट्यूब में भरकर बनाई जाती है.
देशभरात 'कार्बाइड गन'मुळे अनेक लहान मुलांच्या डोळ्यांची दृष्टी हिरावली आहे. लहान मुलांसाठी हे एक जीवघेणे खेळणे ठरत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये या अवैध आणि धोकादायकबु बंदुकीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
दीडशे रुपयांच्या या कार्बाइड गनच्या वापरामुळे डोळ्यांच्या गंभीर दुखापतींच्या घटनांमध्ये अचानक आणि धोकादायक वाढ दिसून आली आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, केवळ तीन दिवसांत, भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूरसह संपूर्ण मध्य प्रदेशात 122 हून अधिक लहान मुले डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाली आहेत. विदिशा जिल्ह्यात खुलेआम विकल्या जाणाऱ्या या जुगाडी कार्बाइड गनमुळे 14 निष्पाप मुलांच्या डोळ्यांची दृष्टी गेली आहे. भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात एकट्या 26 हून अधिक केसेसची नोंद झाली आहे.
देशातील इतर राज्यांमध्येही या 'जीवघेण्या खेळण्या'चा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये कॅल्शियम कार्बाइड गनमुळे एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये फटाक्यांना पर्याय म्हणून कार्बाइड गनचा वापर वाढला आहे, ज्यामुळे आतापर्यंत 50 हून अधिक लोकांची दृष्टी गेली आहे.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad: बायकोला नगरसेवक बनवायचे होते, तिनेच घात केला; नवऱ्याची गळा आवळून हत्या, कारण...)
काय आहे कार्बाइड गन?
कार्बाइड गन ही घरगुती उपकरणे आहेत, जी प्लास्टिक किंवा टिन पाईपपासून बनवली जाते. त्यात कॅल्शियम कार्बाइड आणि पाण्याचा वापर करून रासायनिक अभिक्रिया निर्माण केली जाते ज्यामुळे मोठा स्फोट होतो. तज्ञांचे म्हणणे आहे की ते खेळण्यांसारखे दिसत असले तरी, हे उपकरणे अत्यंत धोकादायक आहेत. कार्बाइड गनमध्ये कॅल्शियम कार्बाइड, माचिस आणि गनपावडर यांचे मिश्रण असते. कॅल्शियम कार्बाइडमध्ये पाणी मिसळल्याने एसिटिलीन वायू तयार होतो, जो जळल्याने शक्तिशाली स्फोट होतो. ज्यामुळे तीव्र उष्णता आणि हानिकारक वायू बाहेर पडतात.
(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)
कार्बाइड गन कशी बनवली जाते?
हमीदिया रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. मनीष शर्मा आणि इतर नेत्रतज्ज्ञांनी सांगितली केली, ही गन माचिसच्या काड्या आणि फटाक्यांची दारू एकत्र करून प्लॅस्टिक किंवा टीनच्या ट्यूबमध्ये भरून तयार केली जाते. स्फोटाच्या वेळी, तीक्ष्ण छर्रे आणि धातूचे कण थेट डोळ्यांवर आदळतात. अनेक प्रकरणांमध्ये, डोळ्याची बुबुळ फुटण्यापर्यंत परिस्थिती गंभीर झाली आहे. ज्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
सोशल मीडिया 'चॅलेंज' जबाबदार
या धोकादायक ट्रेंडमागे मुख्यत्वे इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब चॅलेंज व्हिडिओज जबाबदार असल्याचे मानले जात आहे. पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या मुलांना सोशल मीडियाच्या अशा धोकादायक 'चॅलेंजेस'पासून दूर ठेवावे आणि हे जीवघेणे 'खेळणे' खरेदी करण्यापासून रोखावे.